पत्नी सासरी परतली नाही म्हणून पतीचं टोकाचं पाऊल, संपूर्ण कुटुंबाला जिवंत पेटवलं

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

पत्नी सासरी परतली नाही म्हणून पतीचं टोकाचं पाऊल, संपूर्ण कुटुंबाला जिवंत पेटवलं
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 9:52 PM

कानपूर : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. असाच एक भयंकर प्रकार उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये समोर आला आहे. इथं एका व्यक्तीने सासरी जाऊन थेट सगळ्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी माहेरहून घरी न परतल्यामुळे रागावलेल्या पतीने सासरी जाऊन सगळ्यांना पेट्रोल टाकून पेटवून दिलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (crime News uttar pradesh son in law set ablaze his wifes house in anger 8 people burnt in kanpur)

अधिक माहितीनुसार, या घटनेत एकूण 8 लोक गंभीररित्या भाजले आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आग लावल्यानंतर आरोपी पती पळून गेला. या घटनेची शेजाऱ्यांना माहिती मिळताच तात्काळ आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हे प्रकरण जुही पोलीस स्टेशन परिसरातील रामपुरवा भागातील आहे. मनीषा नावाच्या तरुणीचा विवाह हरदोईच्या इटौजा गावात राहणार्‍या मुकेशशी झाला होता. लग्नापासून मुकेश आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी मुकेशची पत्नी मनीषा पतीशी झालेल्या वादामुळे माहेरी आली होती.

पत्नी माहेरून परत येत नसल्यामुळे रागाने पतीने पेट्रोल भरलेले कॅन घेतलं आणि सासरी जाऊन सगळ्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावून पळून गेला. यामध्ये कुटुंबातील तब्बल 8 जण होरपळले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (crime News uttar pradesh son in law set ablaze his wifes house in anger 8 people burnt in kanpur)

संबंधित बातम्या – 

सोने व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून बेदम मारहाण, सव्वा दोन कोटीचे 4 किलो सोने लंपास

भरदिवसा घरात घुसून सीएची हत्या; पालघरमध्ये खळबळ

(crime News uttar pradesh son in law set ablaze his wifes house in anger 8 people burnt in kanpur)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.