AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या विम्याचं काय झालं ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विमान अपघातात निधन झालेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. जाधव यांचा 1 कोटी रुपयांचा अपघात विमा मंजूर झाला आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले जाधव 28 जानेवारी रोजी कर्तव्य बजावत असताना बारामतीजवळ अपघाताला बळी पडले. वडिलांच्या उपचारांसाठी गावी जाण्याची त्यांची इच्छा होती, पण अखेरचा निरोप आईला देऊन ते परतलेच नाहीत.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या विम्याचं काय झालं ?
अजित पवारांसह त्यांच्या अंगरक्षकाचाही वििमान अपघातात मृत्यू झाला.
| Updated on: Feb 05, 2026 | 8:27 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला एक आठवडा उलटला आहे. गेल्या बुधवारी (28 जानेवारी) त्यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि त्यात अजित पवार यांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांच्यासह आणखी चौघेही मृत्यूमुखी पडले. त्यात अजित पवारांचे पीएसओ (PSO) विदीप जाधव, विमानाचे 2 पायलट आणि फ्लाईट अटेंडंट यांचाही समावेश होता. दरम्यान अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. जाधव यांचा 1 कोटींचा अपघात विमा मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विदीप जाधव यांनी ‘न्यू इंडिया इन्शुरन्स’ या कंपनीचा अपघात विमा घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पहिल्या आठवड्यात कंपनीने अपघात विम्याचा दावा मंजूर केला आहे. विदीप जाधव हे 2009 सालच्या तुकडीचे असून ते मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. ते 2014 ते 2019 या वर्षांच्या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात कार्यरत होते. तर गेल्या काही काळापासू ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्ष म्हणून कार्यरत होते.

सांभाळून कामावर जा लवकर घरी ये.. घरच्यांनी दिला होता निरोप

विदीप जाधव हे मुंबईतील कळव्यात रहात होते. घटनेच्या दिवशी ते बाहेर पडले,तीच त्यांच्या कुटुंबियाशी शेवटची भेट ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, जाधव हे कळवा विटावा सूर्यनगर ,शनिवार पार्क जवळ श्रीकृष्ण विहार खोली क्रमांक 9 येथे कुटुंबीयांपासून गेल्या 25 वर्षांपासून रहात होते. त्यांचे आई -वडील, पत्नी, मुलगा मुलगी असा त्यांचा परिवार होता. ते मुंबई पोलिस दलात कार्यरत होते आणि अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून काम करत होते. 28 जानेवारी रोजी सकाळी 6 च्या सुमारास कामासाठी ते घराबाहेर पडले. तेव्हा सांभाळून कामावर जा, लवकर ये असा निरोप त्यांच्या आईने लेकाला दिला होता. मात्र त्यानतंर जाधव परत आलेच नाहीत, विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी घरी थडकली आणि संपूर्ण कुटुंब दु:खात बुडालं.

वडिलांच्या उपचारांसाठी गावी जायचं होतं

मिळालेल्या माहितीनुसार, विदीप जाधव यांना वडिलांच्या उपचारासाठी गावी जायचे होते. त्यांचे गाव बारामतीपासून 25 किमी अंतरावर फलटण तालुक्यात तरडवाडी आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजीच्या दौऱ्याची ड्युटी घेतली होती. बारामतीहून ते गावी जाणार होते. तसे त्यांनी अजित पवार यांना सांगितलं देखील होतं. घरी येतो असं त्याने गावी कळवलं होतं. पण अजित पवार यांच्यासोबतच विमानतील तो त्यांचा शेवटचा प्रवास ठरला.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच