AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, साखरेच्या दरात तब्बल 9 टक्क्यांनी वाढ, सरकारने घेतला मोठा निर्णय

मोठी बातमी समोर येत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना आणखी एक महागाईचा मोठा झटका बसला आहे. गेल्या एक महिन्याच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, साखरेच्या दरात तब्बल 9 टक्क्यांनी वाढ, सरकारने घेतला मोठा निर्णय
sugaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 08, 2026 | 2:55 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना आणखी एक महागाईचा मोठा झटका बसला आहे. गेल्या एक महिन्याच्या काळात साखरेच्या दरात सरासरी 6.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात साखरेची सरासरी किंमत प्रति किलो 47.17 रुपये एवढी होती. मात्र ती आता वाढून 50.30 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत साखरेच्या दरात जवळपास 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. श्रावण महिना हा सणांचा महिना असतो, या काळात अनेक सण असतात, तसेच पुढे देखील गौरी गणपती, दसरा, दिवाळी या सारखे मोठे सण आहेत. सणांच्या काळात साखरेला मोठी मागणी असते, मात्र ऐन सणांच्या तोंडावरच साखरेच्या दराचा भडका उडाल्याने त्याचा मोठा आर्थिक ताण आता ग्राहकांवर पडणार आहे.

दरम्यान साखरेचे भाव अचानक वाढल्यामुळे आता सरकारने देखील मोठं पाऊल उचललं आहे. सणाच्या काळात साखरेची वाढती मागणी पहाता साखरेचे दर स्थिर राहावेत आता त्यात आणखी वाढ होऊ नये यासाठी सरकारने देशभरातील साखर व्यापाऱ्यांवर साखरेचा साठा करण्यासंदर्भात मर्यादा लागू केल्या आहेत. एक ऑगेस्ट 2026 ते 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत या साठेबाजीच्या मर्यादा लागू असतील असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. साखरेच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवणे हा या मागे उद्देश असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

साखरेचे दर गेल्या महिनाभरापासून सतात्याने वाढत आहेत. साखरेच्या दरावर नियंत्रण मिळवणं, ग्राहकांना वेळेत पुरेल इतका साखरेचा साठा उपलब्ध करून देणं आणि वितरण साखळी सुरळीत सुरू ठेवणं हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे देशभरातली साखर व्यापाऱ्यांवर साखरेचा साठा करण्यासंदर्भात मर्यादा लागू केल्या आहेत, अशी माहिती सरकारने दिली आहे.

साखरेचे भाव का वाढले

समोर आलेल्या माहितीनुसार ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या प्रमुख डिर्सनी साखरेची साठेबाजी केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुरवठा आणि मागणी याचं प्रमाण विस्कळीत झालं आहे. मागणीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे साखरेचे भाव देखील चांगलेच वाढले आहेत. आता हे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?