AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान

राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान

| Updated on: Aug 08, 2026 | 1:43 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून सुरू असलेल्या चर्चांवर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. येवला येथे बोलताना त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या गैरहजेरीबाबतही स्पष्टीकरण दिले. प्रशांत किशोर हे कधी आम्हालाही भेटतात. त्याचा अर्थ ते राजकीय सल्लागार होऊन त्यांची नियुक्ती झाली असे मला वाटत नाही, असे भुजबळ म्हणाले.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दिल्लीतील अधिवेशनामुळे व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यात ते भेटले आणि चर्चा पण कदाचित झाली आहे. फोनवर सुद्धा एखाद्या गोष्टीची चर्चा होते. एवढं काही सिरीयस घ्यायचं कारण आहे असं मला वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रूपाली ठोंबरे यांच्या सुनील तटकरे यांच्यावरील निशाण्यावर भुजबळ यांनी सर्वांनी शांततेत घेतले पाहिजे, असे म्हटले. अजित दादांवर प्रेम होते म्हणूनच आम्ही सर्व पवार साहेबांना सोडून इकडे आलेलो होतो हे पण लक्षात घ्यायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सुनिता ताई पवार यांना कोणाला भेटायचं कोणाला नाही भेटायचं त्या ठरवतील, आमच्या परवानगीची गरज नाही, असे भुजबळ म्हणाले.

Published on: Aug 08, 2026 01:43 PM

Follow Us