रेल्वेतील सुरक्षा वाढवा, सीसीटीव्ही बसवा, पुष्पक एक्स्प्रेस बलात्कार प्रकरणानंतर नीलम गोऱ्हेंचे गृहमंत्र्यांना पत्र

| Updated on: Oct 11, 2021 | 3:40 PM

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहलिले आहे. या पत्रात त्यांनी सीसीटीव्ही बसवणे तसेच रेल्वेतील सुरक्षा वाढण्याची मागणी केली आहे.

रेल्वेतील सुरक्षा वाढवा, सीसीटीव्ही बसवा, पुष्पक एक्स्प्रेस बलात्कार प्रकरणानंतर नीलम गोऱ्हेंचे गृहमंत्र्यांना पत्र
NEELAM GORHE
Follow us on

पुणे : पुष्पक एक्स्प्रेसमधील दरोडा तसेच महिला बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर ठोस उपाय करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सीसीटीव्ही बसवावेत तसेच रेल्वेतील सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली.

महिला सुरक्षा वाढवा, सीसीटीव्ही बसवा 

8 ऑक्टोबर रोजी धावत्या पुष्पक एक्स्प्रेस या रेल्वेत दरोडेखोरांनी एका महिलेवर अत्याचार केला. तसेच रेल्वेत दरोडा टाकून तब्बल 96 हजार रुपयांचा मोबाईल चोरला. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी महिला सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. तसेच महिलांची सुरक्षा वाढण्याची मागणी केलीय. “रेल्वेतील सुरक्षा वाढवायला हवी. तसेच रेल्वे आणि रेल्वे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. पुष्पक एक्स्प्रेस बलात्कार प्रकरणात आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत,” अशी मागणी केली.

नेमकं प्रकरण काय?

लखनऊ-सीएसटी पुष्पक एक्सप्रेसमध्ये 8 ऑक्टोबरच्या रात्री साडेसात वाजता डी टू या बोगीत दरोडा टाकण्यात आला. आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल तसेच रोकड लूटली होती. मारहाणीत सहा प्रवासी जखमी झाले होते. नऊ प्रवाशांचे मोबाईल आणि सहा प्रवाशांची रोकड या दरोडखोरांनी पळवले होते. तसेच एका महिलेवर दोन आरोपींनी लैगिंक अत्याचार केला होता.

सहा आरोपी पळून गेले, दोघांना प्रवाशांनी पकडून ठेवलं

या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यस्था पूर्णपणे ढासळली आहे, असा आरोप विरोधकांकडून होत होता. तसेच आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सूत्रे हालवत सर्वच्या सर्व म्हणजेच आठ आरोपींना अटक केली. त्याआधी दरोडा तसेच महिलेवर बलात्कार केल्यानंत आठ पैकी तीन आरोपी पळून गेले होते. नंतर पाच पैकी तीन आरोपी कसारा स्टेशनवर उतरले होते. तर दोन आरोपींना प्रवाशांनी पकडून ठेवले होते.

पोलिसांनी तपास कसा केला ?

मध्य रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालीद, उपायुक्त मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल, पोलीस निरीक्षक पांढरी कांदे, पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांचे तीन पथके आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी तपास सुरु केला होता. या गुन्ह्यातील आरोपी अरशद शेख, प्रकाश पारधी, अर्जुन परदेशी, किशोर सोनवणे, काशीनाथ तेलंग, आकाश शेनोरे, धनंजय भगत आणि राहूल आडोळे या आठही आरोपींनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

इतर बातम्या :

पाण्यावरुन वाद, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून प्राणघातक हल्ला, अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक घटना

Maharashtra Band : ठाण्यात उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण! व्हिडीओ उजेडात

एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूह 15 हजार कोटींचे कर्ज घेण्याची शक्यता, एसबीआयसह परदेशी बँकांशी बोलणी सुरु

(neelam gorhe write letter to maharashtra home minister dilip walse patil on women safety and pushpak express rape case)