Maharashtra Band : ठाण्यात उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण! व्हिडीओ उजेडात

ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे स्थानिक नेते महाराष्ट्र बंदवेळी रिक्षाचालकांना मारहाण करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात उपमहापौरांचे पती पवन कदम हे रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावताना पाहायला मिळत आहेत!

Maharashtra Band : ठाण्यात उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण! व्हिडीओ उजेडात
ठाण्यात शिवसैनिकांकडून रिक्षाचालकांना मारहाण
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 3:11 PM

ठाणे : लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र, ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे स्थानिक नेते महाराष्ट्र बंदवेळी रिक्षाचालकांना मारहाण करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात उपमहापौरांचे पती पवन कदम हे रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावताना पाहायला मिळत आहेत! (Shivsena leader Pawan Kadam and others beat up rickshaw pullers in Thane)

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केल्यानंतर आज सकाळपासूनच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. ठाण्यात उपमहापौर यांचे पती पवन कदम आणि काही सहकाऱ्यांसह महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेतला. मात्र, त्यावेळी रिक्षा वाहतूक सुरु असल्याचं पाहून त्यांनी रिक्षाचालकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने तर हातात काठी घेत येणाऱ्या प्रत्येक रिक्षाचालकांना मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. पवन कदम यांनीही एका रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ टीव्ही 9 च्या हाती लागलाय.

महापौर नरेश म्हस्के दिलगिरी व्यक्त करणास तयार

दरम्यान, ठाण्यात शिवसैनिक रिक्षाचालकांना मारहाण करत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर टीव्ही 9 मराठीने ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. त्यावेळी काही रिक्षाचालक महाराष्ट्र बंद असल्यामुळे ग्राहकांकडून जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, असा प्रकार कुठे झाला असेल तर मी त्याची चौकशी करेल. या प्रकरणी मी दिलगिरी व्यक्त करण्यासही तयार आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले.

पवारांचं आवाहन शिवसेनेचे नेते विसरले काय?, दरेकरांचा सवाल

शरद पवारांनी सोलापूरात बोलताना हा बंद शांततेत, संयमान पार पाडण्याचं आवाहन केलं होतं. पण या सरकारमधील तिनही पक्षात ताळमेळ नाही. कुणाचा कुमाला पायपोस नाही, असं दिसत आहे. आपल्याच नेत्याच्या आवाहनाला हरताळ फासण्याचं काम सुरु आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलीय.

रिक्षा चालकाला व्हॅनमध्ये घालून पोलिसांची बेदम मारहाण

ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बंद पुकारला. त्यामुळे सकाळपासूनच ठाण्यात दुकाने बंद होती. वाहतूकही तुरळक प्रमाणात सुरू होती. त्यावेळी एक रिक्षा चालक रस्त्यावर पोलिसांशी हुज्जत घालत होता. त्यामुळे पोलिसांनी या रिक्षा चालकाला पोलीस व्हॅनमध्ये टाकले आणि त्याला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कॅमेऱ्यावर हात ठेवून हे चित्रीकरण थांबवले.

इतर बातम्या : 

मावळ गोळीबारावेळी जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही?, फडणवीसांचा पवारांवर निशाणा

शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं भाजपकडून अप्रत्यक्ष समर्थन, जयंत पाटलांचा घणाघात

Shivsena leader Pawan Kadam and others beat up rickshaw pullers in Thane

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.