शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं भाजपकडून अप्रत्यक्ष समर्थन, जयंत पाटलांचा घणाघात

लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केलीय.

शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं भाजपकडून अप्रत्यक्ष समर्थन, जयंत पाटलांचा घणाघात
जयंत पाटील, जलसंपदा मंत्री


मुंबई : भाजपकडून या बंदला विरोध म्हणजे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन आहे. लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केलीय. मुंबईत आज जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. (BJP indirectly supports Lakhimpur violence, Jayant Patil criticizes BJP)

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. भाजपाच्या मंत्र्यांच्या चिरंजीवाने हे हत्याकांड केलंय. अद्यापही त्याला अटक होत नाही, त्याला सन्मानाने बोलावलं जातं. भाजपाला शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम करायचं आहे. त्याचा निषेध म्हणून मविआच्या सर्वच पक्षांनी हा बंद पुकारला आहे. सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही. भाजपने केलेल्या या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आहे, असंही पाटील म्हणाले.

हे तर मुघलांचं राज्य, सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र

केंद्र सरकार हे मुघलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नाही. छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मानच केला आहे. या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे. अर्थात हे मुघलांचं राज्य चाललं आहे, अशी टीका सुळे यांनी केलीय. महिलांचा मानसन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही. या देशातील महिला अबला आहे असं त्यांना वाटतं. याच महाराष्टातील मुली मग ती सावित्री असू दे अहिल्या देवी किंवा राणी लक्ष्मीबाई… यांचं कर्तृत्व हे सरकार विसरलं आहे. म्हणून सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण महाराष्ट्राच्या लेकी या अत्याचाराच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होती. कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा घ्या

लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्यात येत असल्याचा व्हिडीओ पाहिला. त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारला आहे. ही सत्तेची मस्ती आहे. तुम्ही तो व्हिडीओ बघा. यात माणुसकी दिसते. ही क्रूरता आहे. उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत चुकीची आहे, असं सांगतानाच नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रातील मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केलीय.

इतर बातम्या :

मावळ गोळीबारावेळी जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही?, फडणवीसांचा पवारांवर निशाणा

सुप्रियाताईंचा सूर आणि दिशादर्शन चुकीचं; संजय राऊतांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरावं, शेलारांची टोलेबाजी

BJP indirectly supports Lakhimpur violence, Jayant Patil criticizes BJP

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI