Video : आधी धूर, मग स्फोट..; Ola S1 Pro स्कूटरला भररस्त्यात लागली आग, तर चांगल्या दर्जाचं साहित्य वापरल्याचा कंपनीचा दावा

| Updated on: Mar 27, 2022 | 2:11 PM

OLA Electric Scooter fire : ओला इलेक्ट्रिक (Electric) स्कूटरची ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या स्कूटरच्या सुरक्षेवर (Security) प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ओला स्कूटरला अचानक आग लागल्याचे दिसत आहे.

Video : आधी धूर, मग स्फोट..; Ola S1 Pro स्कूटरला भररस्त्यात लागली आग, तर चांगल्या दर्जाचं साहित्य वापरल्याचा कंपनीचा दावा
पुण्यात भररस्त्यात ओलाच्या स्कूटरला आग
Image Credit source: Twitter
Follow us on

OLA Electric Scooter fire : स्कूटर्स भारतीय बाजारपेठेत धमाल करत आहेत. ओला इलेक्ट्रिक (Electric) स्कूटरची ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत कंपनीला विक्रमी बुकिंग (Booking) मिळाले आहे. दरम्यान, आता या स्कूटरच्या सुरक्षेवर (Security) प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यामध्ये ओला स्कूटरला अचानक आग लागल्याचे दिसत आहे आणि धुराने ते जळू लागते. आग लागण्यापूर्वी स्फोटाचा आवाजही येतो. या 15 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसत आहे. ज्यामध्ये धूर आणि ज्वाळा उठत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही पुण्याची नोंदणीकृत Ola S1 Pro स्कूटर आहे. आधी स्कूटरमधून धूर निघतो आणि नंतर स्फोट होऊन स्कूटरला आग लागते.

कारणांचा घेतला जातोय शोध

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ओलाने स्पष्टीकरणही दिले आहे. कंपनीने सांगितले, की ते स्कूटरशी संबंधित व्यक्तीशी बोलणे झाले आहे आणि सर्व पूर्णपणे सुरक्षित आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की पुण्यात ओला स्कूटरला आग लागल्याची माहिती मिळाली आहे, त्यानंतर कारणांचा शोध घेतला जात असून लवकरच माहिती उपलब्ध होईल.

वाहनांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची

या घटनेनंतर ओएलएचे म्हणणे आहे, की वाहनांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, स्कूटरमध्ये चांगल्या दर्जाची उत्पादने वापरली जातात. घटना गांभीर्याने घेतली आहे आणि योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. लिथियम-आयन बॅटरीचे नुकसान किंवा शॉर्ट सर्किटमुळे असे घडले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दोन स्कूटर लॉन्च

हे लक्षात घेण्यासारखे आहे, की OLA S1ची सुरुवातीची किंमत 1 लाख रुपये आहे आणि OLA S1 Proची किंमत 1.30 लाख रुपये आहे. S1 पूर्ण चार्ज केल्यावर 120 किमी पर्यंत चालवता येतो आणि S1 प्रो एका चार्जवर 180 किमीपर्यंत चालवू शकतो. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये सबसिडीनुसार निश्चित केल्या जातात.

आणखी वाचा :

Pune Crime | पुण्यात तरुणांची भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिसांवर ‘कोयत्याने’ वार

Pimpri Chinchwad crime : खंडणी मागणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या, त्याही थेट पोलीस आयुक्तांनी! पाहा Video

.. तिकडे सभा घेतली की चांगला रिझल्ट आलाय, दूरदृष्टी ठेवली सभासदांच्या हिताचे निर्णय होतात – उपमुख्यमंत्री अजित पवार