Pune crime : ट्रेडिंग खातं तयार करायला सांगून व्यावसायिकाची साडेबारा लाखांची ऑनलाइन फसवणूक, पुण्यात गुन्हा दाखल

| Updated on: May 13, 2022 | 11:15 AM

सायबर पोलीस स्टेशनने तक्रारीची पडताळणी करून ती वानवडी पोलीस ठाण्यात पाठवली. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, असे वानवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप शिवले यांनी सांगितले.

Pune crime : ट्रेडिंग खातं तयार करायला सांगून व्यावसायिकाची साडेबारा लाखांची ऑनलाइन फसवणूक, पुण्यात गुन्हा दाखल
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : ऑनलाइन ट्रेडिंग खात्याद्वारे मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे खोटे आश्वासन देऊन व्यावसायिकाची पुण्यात फसवणूक (Duped) करण्यात आली आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी पुण्यातील या व्यावसायिकाला त्याच्या सेल फोनवर ‘रिमोट डेस्कटॉप’ सॉफ्टवेअर डाउनलोड करून 12.5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. वानवडी (Wanwadi) येथील रहिवासी असलेल्या 58 वर्षीय पीडितेने बुधवारी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या व्यावसायिकाला ऑक्टोबर 2021मध्ये एका व्यक्तीचा फोन आला, ज्यामध्ये त्याला वेबसाइटद्वारे पैसे गुंतवण्यासाठी ‘ट्रेडिंग खाते’ (Trading account) तयार करण्यास सांगितले. या व्यक्तीने एका लिंकसह एक मेसेज फॉरवर्ड केला आणि व्यावसायिकाला त्याच्या सेल फोनवर सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले. त्याने तत्काळ तक्रारदाराच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला आणि यावर्षी 15 जानेवारीपर्यंत त्याच्या बँक खात्यातून 12.5 लाख रुपये ट्रान्सफर केले.

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

सायबर पोलीस स्टेशनने तक्रारीची पडताळणी करून ती वानवडी पोलीस ठाण्यात पाठवली. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, असे वानवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप शिवले यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात फसवणूक करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 419. 420, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कोणत्याही अज्ञात क्रमांकावरून फोन आल्यास त्याची शहानिशा करूनच पुढील कार्यवाही करावी, बँक डिटेल्स कोणालाही शेअर करू नये, कोणतीही लिंक ओपन करू नये, असे आवाहन पोलिसांनी यानिमित्ताने केले आहे.

वृद्ध महिलेची झाली होती फसवणूक

अशाच एका गुन्ह्यात ऑनलाइन चोरट्यांनी वारजे येथील एका 69 वर्षीय महिलेची 2 लाख रुपयांनी फसवणूक केली होती. याप्रकरणी तिने बुधवारी वारजे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी सांगितले, की फसवणूक करणाऱ्याने सुरुवातीला महिलेला फोन केला आणि आपण एका कस्टमर केअर कंपनीची एक्झिक्युटिव्ह असल्याचा दावा केला. त्याने महिलेला सांगितले, की तिचे सिम कार्ड ब्लॉक होऊ शकते आणि ते टाळण्यासाठी तिला ‘प्रोसेसिंग फी’ म्हणून 10 रुपये द्यावे लागतील.

हे सुद्धा वाचा