दुष्काळ आहे, घरच्यांना थोडा वेळ द्या… पायल झांबरेने केली होती विनंती, शेवटच्या संभाणाची माहिती समोर

पुण्यातील आयटी इंजिनिअर पायल झांबरे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून पायलने टोकाचे पाऊल उचलले. आता तिच्यासोबतच्या शेवटच्या संवादाबाबत

दुष्काळ आहे, घरच्यांना थोडा वेळ द्या... पायल झांबरेने केली होती विनंती, शेवटच्या संभाणाची माहिती समोर
Payal Zambre
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 11:38 AM

पुण्यातील आयटी इंजिनिअर पायल झांबरे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. पायल यांनी सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. पायल या पुण्यातील नामांकित उद्योगपती झांबरे यांच्या सून आहेत. पायल यांच्या निधनानंतर नवरा, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पायलच्या माहेरच्या लोकांनी नामांकित झांबरे पॅलेसची तोडफोड केली. आता पायल आणि तिच्या सासरच्या मंडळींमध्ये शेवटचे काय संभाषण झाले होते हे समोर आले आहे.

पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत होता. पती अक्षय झांबरे, सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून पैशांसोबत सोन्याचीही मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी दिवाळीच्या सुमारास माहेरहून पाच ते दहा तोळे सोने आणण्याची मागणी केली जात असल्याचे पायल यांच्या नातेवाइकांनी सांगितले आहे. यंदाही अशीच मागणी करण्यात आली होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे माहेरच्या मंडळींनी सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

Loading...

“वेळ मागितला होता..”

पायल यांचे कुटुंब शेतकरी असून दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी पुढच्या हंगामापर्यंत वेळ मागितला होता. तरीही छळ सुरूच राहिला. सासरच्या मंडळींच्या या सततच्या मागण्यांमुळे पायल यांच्यावर मानसिक दबाव निर्माण होत होता आणि त्यांचा छळ सुरू होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या सर्व आरोपांची सत्यता पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

माहेरच्या लोकांनी व्यक्त केला संशय

पुण्यातील मुकुंदनगर येथील अक्षय हाइट्स सोसायटीमधील फ्लॅटमध्ये पायलने 2 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. प्राथमिक माहितीनुसार, पायलने राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलले. पण तिच्या माहेरच्या लोकांनी यावर संशय व्यक्त केला आहे. पायलची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कारण पायल ही अतिशय शांत स्वभावाची होती. ती इतके टोकाचे पाऊल उचलणार असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us