PMPML : तोट्यात असणारे 25 मार्ग पीएमपी करणार बंद तर नव्या चार मार्गांवर देणार सेवा, वाचा सविस्तर…

| Updated on: Jul 31, 2022 | 4:29 PM

पीएमपी तोट्यात आहे. त्यामुळे ज्या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद अल्प आहे, अशा ठिकाणची सेवा थांबवत आहोत. तर ज्याठिकाणी प्रवाशांचा अधिक प्रतिसाद आहे, अशा नव्या मार्गांवर सेवा सुरू करत आहोत, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे.

PMPML : तोट्यात असणारे 25 मार्ग पीएमपी करणार बंद तर नव्या चार मार्गांवर देणार सेवा, वाचा सविस्तर...
पीएमपीएमएल बस (संग्रहित छायाचित्र)
Image Credit source: Wiki
Follow us on

अभिजीत पोटे, पुणे : शहरातील जवळपास 25 मार्ग बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल (PMPML) प्रशासनाने घेतला आहे. तर नव्याने चार मार्ग सुरू करण्याचा निर्णय देखील प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. शहरातील एकूण 25 मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद खूप अल्प प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या पीएमपी प्रशासनाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे हे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी तोट्यातील हे मार्ग (Unprofitable routes) बंद करण्यात येणार आहेत. तर शहरातील काही मार्गांवरचा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता 20 मार्गांवर बसच्या फेऱ्या अधिक वाढवण्याचा निर्णयदेखील पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तर चार नवे मार्गही सुरू करण्यात येणार आहे. येत्या तीन दिवसात याचीदेखील अंमलबजावणी (Implementation) होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

तोट्यातील 25 मार्ग कोणते?

  1. मनपा भवन-आदित्य गार्डन सोसायटी
  2. स्वारगेट-मिडीपॉइंट
  3. स्वारगेट-कात्रज मार्गे लेकटाउन
  4. स्वारगेट-बोपदेव घाट मार्गे सासवड
  5. हे सुद्धा वाचा
  6. तळजाई पठार-स्वारगेट
  7. सासवड-उरुळी कांचन
  8. कात्रज-कोंढणपूर
  9. उरुळी कांचन-खामगाव
  10. वाघोली-न्हावी सांडस
  11. हडपसर-उरुळी कांचन
  12. डेक्कन-पिंपळे निलख
  13. डेक्कन-मिडीपॉइंट
  14. वाघोली-करंदीगाव
  15. पुणे स्टेशन-ताडीवाला रस्ता
  16. निगडी-देहूगाव
  17. हिंजवडी फेज ३-इंटरसिटी फेज ३
  18. चिखली-हिंजवडी माण फेज ३
  19. भोसरी-पाबळगाव
  20. राजगुरुनगर-कडूस
  21. पिंपळे गुरव-शितळादेवी चौक१७.
  22. पिंपळे गुरव-काटेपुरम
  23. हडपसर-फुरसुंगी हरपळेवस्ती
  24. हडपसर-फुरसुंगी शेवाळेवाडी
  25. शेवाळेवाडी-पिंपरीगाव
  26. यवत-सासवड

नवे चार मार्ग कोणते?

  1. स्वारगेट-नांदेड सिटी
  2. मनपा भवन-खराडी
  3. हडपसर-वाघोली मार्गे इऑन आयटी पार्क
  4. कात्रज-पुणे स्टेशन मार्गे गंगाधाम

प्रवाशांच्या प्रतिसादानंतर नवे मार्ग

पीएमपी तोट्यात आहे. त्यामुळे ज्या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद अल्प आहे, अशा ठिकाणची सेवा थांबवत आहोत. तर ज्याठिकाणी प्रवाशांचा अधिक प्रतिसाद आहे, अशा नव्या मार्गांवर सेवा सुरू करत आहोत, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे. मागे एसटी संपावेळी ग्रामीण भागातील तोट्यातील मार्ग पीएमपीने बंद केले होते. दरम्यान, प्रवासी संख्या वाढण्याच्या दृष्टीने पीएमपी योजनाही राबवत असते. यंदा वर्धापनदिनी पीएमपीने वर्षभर मोफत प्रवासाची योजना आणली. त्यासाठी लकी ड्रॉदेखील काढण्यात आला होता. बसची संख्याही वाढवण्यात आली आहे. सीएनजीसोबतच इलेक्ट्रिक बसेसदेखील पीएमपीच्या ताफ्यात आहेत.