पुण्यात PMPL कॅब सर्व्हिस सुरू करणार, ई बसेसचा ताफाही वाढवणार, पालिकेचा प्लॅन काय? वाचा सविस्तर

| Updated on: Jan 27, 2022 | 9:06 PM

पुण्यातील पीएमपीएल आता बस सेवेबरोबरच कॅब सर्व्हिस (PMPL Cab Service) देखील सुरू करणार आहे.

पुण्यात PMPL कॅब सर्व्हिस सुरू करणार, ई बसेसचा ताफाही वाढवणार, पालिकेचा प्लॅन काय? वाचा सविस्तर
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

पुणे : महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक बससेवा पीएमपीएलकडून (PMPL) पुरवली जाते. पुण्यातून इतर ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी रेल्वे, विमानसेवा, राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस ही प्रमुख साधनं आहेत. तर, पुणे आणि पिंपरी चिचंवडमधील नागरिकांना पीएमपीएलकडून बससेवा पुरवली जाते. पीएमपीएल आता पुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. पुण्यातील पीएमपीएल आता बस सेवेबरोबरच कॅब सर्व्हिस (PMPL Cab Service) देखील सुरू करणार आहे. इतकंच नाही तर PMPL ची सेवा अधिकाधिक स्मार्ट आणि पर्यावरण पूरक बनवण्याच्या दृष्टिकोनातून ई बसेसची (E-buses) संख्या वाढवणे, पब्लिक चार्जिंग स्टेशन्स उभारणे, तिकीट बुकिंग साठी मोबाईल अँप विकसित करणे अशा अनेक गोष्टी येत्या काही काळात केल्या जाणार आहेत.

PMPL ची कॅब उबर,ओलाला देणार टक्कर

पीएमपीएल तर्फे सुरु केली जाणारी ई-कॅब सेवा ही इतर कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत आणि रिक्षाच्या तुलनेत ही सेवा स्वस्त असेल, असा दावा पीएमपीएलकडून करण्यात आला आहे. ओला, उबेरमुळे आव्वाच्या सव्वा भाडे पुणेकरांना भरावे लागेत, त्याचा आर्थिक भार हा पुणेकरांच्या खिशावर पडत आहे, तोच आर्थिक भार कमी करण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे ओला उबरला टक्कर देण्यासाठी पुणे महापालिकेने हा पर्याय आखला आहे. याशिवाय पुण्यातले प्रदुषण कमी होईन, इंधन बचतही होणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाचा ताण तर कमी होणारच आहे सोबतच पुण्यातलं राहणीमानही सुधारण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील परिवहन सेवेच्या माध्यमातून ई-कॅबद्वारे प्रवाशांना सेवा देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. विमानतळ, एसटी, रेल्वे स्थानक तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी या कॅब प्रवाशांना उपलब्ध असतील, अशी माहिती मिळत आहेत.

7 ठिकाणी पब्लिक चार्जिंग स्टेशन्स उभारणार

या ई बस चार्ज करण्यासाठी पुणे महापालिका स्वतंत्र प्लॅन आखत आहेत. पुणे महापालिकेद्वाारी चार्जिंगच्या सोयीसाठी 7 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. 500 नवीन ई बसेसही पीएमपीएलच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. या बसेसचे वेळापत्रक तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील ॲपवर कळणार अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात येत आहे, एवढेच नाही तर तिकीटही तुम्हाला मोबाईलवर काढता येणार आहे.

Pune cyber crime| पुण्यात सायबर चोराने तरुणाला घातला इतक्या लाखांना गंडा

Mayor infected with corona| पुण्यात महापौर मुरलीधर मोहळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

SPPU Exam | पुणे विद्यापीठाच्या फेब्रुवारीच्या मध्यात सुरु होण्याची शक्यता ; बॅकलॉगच्या परीक्षा कधी होणार घ्या जाणून