पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट, आत्महत्या नैराश्यातून; पोलिसांचा पंचनामा

| Updated on: Feb 13, 2021 | 5:41 PM

पूजा चव्हाण कथित मंत्र्यांच्या संबंधामुळे पूजाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यातच आता पोलिसांनी याबाबत अधिक स्पष्टपणे सांगितलं आहे. (pooja chavan commits suicide due to depression says pune police)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट, आत्महत्या नैराश्यातून; पोलिसांचा पंचनामा
Follow us on

पुणे: पूजा चव्हाण कथित मंत्र्यांच्या संबंधामुळे पूजाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यातच आता पोलिसांनी याबाबत अधिक स्पष्टपणे सांगितलं आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. (pooja chavan commits suicide due to depression says pune police)

पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी शवविच्छेदन अहवालातील मोजकीच माहिती मीडियाला दिली आहे.

त्या दोन व्यक्तिंबाबत मौन

पूजाने आत्महत्या केली. तेव्हा तिच्या सोबत घरात दोन व्यक्ती होते. पोलिसांनी त्या दोन व्यक्तिंबाबत मौन पाळलं आहे. त्यांच्याविषयी काहीही माहिती दिली नाही. या दोन व्यक्तिंची चौकशी केल्यानंतर त्यातून काय माहिती समोर आली हे पोलिसांनी स्पष्ट केलं नाही.

लॅपटॉप, मोबाईलबाबत मौन

पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल बाबतही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल जमा केला का? त्याची तपासणी केली का? त्यातून काही माहिती आली का? ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख होत असलेला मोबाईल आणि लॅपटॉप कुठे आहे? याबाबतही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. शिवाय ऑडिओ क्लिपमधील संभाषणाबाबत आणि त्यानुषंगाने करण्यात आलेल्या तपासाबाबतही पोलिसांनी मौन पाळलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच संशय निर्माण होत आहे.

30 ते 32 फूटावरून उडी

पूजा पुण्यात राहत असलेल्या हेवनपार्क सोसायटी ही तीन मजली आहे. यातील तिसऱ्या मजल्याला पायऱ्या नसल्याने या मजल्यावर कोणालाही जाता येत नाही. या संपूर्ण इमारतीत केवळ पाच कुटुंब राहतात. पूजा पहिल्या मजल्यावर राहत होती. टू-बीएचकेच्या फ्लॅटमध्ये ती राहत होती. सोसायटीच्या समोर सिमेंटचा रस्ता आहे. पहिला मजला आणि रोडचं अंतर 30 ते 32 फूट असल्याचं सांगण्यात येतं. पूजाने रविवारी 7 फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजता आत्महत्या केली. पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून तिने उडी मारून आत्महत्या केली. 30 ते 32 फूटावरून तिने उडी मारल्याने तिच्या डोक्याला मार गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. (pooja chavan commits suicide due to depression says pune police)

संबंधित बातम्या:

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडचा शोध सुरु, बीडमध्ये लपल्याची माहिती

पूजा चव्हाणप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?; प्रवीण दरेकरांचा सवाल

(pooja chavan commits suicide due to depression says pune police)