पूजा चव्हाणप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?; प्रवीण दरेकरांचा सवाल

पूजा चव्हाणप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?; प्रवीण दरेकरांचा सवाल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. (pravin darekar reaction on pooja chavan suicide case)

भीमराव गवळी

|

Feb 13, 2021 | 4:58 PM

शिर्डी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. याप्रकरणातील संशयाची सूई असलेले वन मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या प्रकरणावरून काही सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. (pravin darekar reaction on pooja chavan suicide case)

प्रवीण दरेकर शिर्डीत आले होते. यावेळी दरेकर यांना पूजा चव्हाण प्रकरणावरून प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनाच सवाल केले. तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहात. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आता ठाकरी बाणा दाखवणार का? असा सवाल दरेकर यांनी केला आहे.

सत्यसमोर यावं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मधील आवाज शिवसेनेच्या एका मंत्र्याशी सुसंगत आहे. त्यामुळे या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करून सत्य जनतेच्या समोर यायला हवे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचं फर्मान

संजय राठोड यांच्या प्रकरणामुळे शिवसेनेची प्रचंड कोंडी झाली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्यांना प्रतिक्रिया विचारल्या जात आहेत. त्यातच राठोड यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यांची बाजू मांडलेली नाही. त्यामुळे काय प्रतिक्रिया द्यावी हा शिवसेना नेत्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मीडियासमोर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशी तंबीच शिवसेनेकडून नेत्यांना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राठोडांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आणि आज या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? तपासात काय तथ्य आहे? राठोड यांचा कितपत सहभाग आहे? व्हायरल क्लिपमध्ये कितीपत सत्यता आहे? त्यातील आवाज राठोडांचाच आहे का? आधी बाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असावी असं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी मुख्यमंत्री गंभीर असून ते राठोडांवर कारवाई करू शकतात, असंही सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजचा दिवस राठोड यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे. (pravin darekar reaction on pooja chavan suicide case)

संबंधित बातम्या:

संजय राठोडांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच उभी, मीडियाशी बोलू नका; शिवसेना नेत्यांना तंबी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत बोलले, पण…

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ‘वर्षा’वर?; मुख्यमंत्र्यांना दिला पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा रिपोर्ट!

फोटो स्टोरी: एक होती पूजा! टिकटॉक स्टार ते सामाजिक कार्यकर्ती!

(pravin darekar reaction on pooja chavan suicide case)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें