पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत बोलले, पण…

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. (sanjay raut on pooja chavan suicide case)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत बोलले, पण...
संजय राऊत, खासदार, शिवसेना

मुंबई: टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. पण संजय राऊत यांनी थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीच या प्रकरणी बोलतील असं राऊत यांनी म्हटलं आहे. (sanjay raut on pooja chavan suicide case)

शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी गाठून पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देतील, असं त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगून या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर राऊत हे नाशिकच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल उशिरा याप्रकरणाची सर्व माहिती घेतली आहे. त्यामुळे ते आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हे आधी संजय राठोड यांच्याशी बोलून त्यांची बाजू ऐकून घेतील. त्यानंतरच उचित निर्णय घेणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला

बीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्यानंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला असून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (sanjay raut on pooja chavan suicide case)

संबंधित बातम्या:

फोटो स्टोरी: एक होती पूजा! टिकटॉक स्टार ते सामाजिक कार्यकर्ती!

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

मंत्री संजय राठोड बोलणार की नाही? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष, भाजपानं दबाव वाढवला!

(sanjay raut on pooja chavan suicide case)

Published On - 10:31 am, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI