मंत्री संजय राठोड बोलणार की नाही? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष, भाजपानं दबाव वाढवला!

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे. (will cm uddhav thackeray take action against sanjay rathod?)

मंत्री संजय राठोड बोलणार की नाही? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष, भाजपानं दबाव वाढवला!


मुंबई: टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे. या प्रकरणात राठोड यांचं नाव आल्यापासून त्यांचा मोबाईल बंद आहे. या आत्महत्या प्रकरणावर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे राठोड यांच्या भोवतीचा संशय अधिकच वाढला आहे. त्यातच भाजपनं राठोड यांच्या चौकशीसाठी दबाव वाढवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (will cm uddhav thackeray take action against sanjay rathod?)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे. पहिल्यांदाच या प्रकरणात राठोड यांचं नाव घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चित्रा वाघ यांनी आधी राठोडांवर कारवाई करा आणि मग या प्रकरणाचा तपास करा असं म्हटलं आहे. तसेच पूजा चव्हाण प्रकरणातील व्हायरल ऑडिओ क्लिप्सचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वाघ यांनी ही मागणी करून बारा तास उलटले आहेत. मात्र, अद्यापही त्यावर राठोड यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. पूजा चव्हाण प्रकरणाशी संबंध नसल्याचंही राठोड यांनी नाकारलं नसून आपल्याला बदनाम केलं जातंय किंवा राजकीय हेतूने प्रेरित आरोप आहेत किंवा पूजाला आपण ओळखत नाही, असं कुठलंही उत्तर राठोड यांच्याकडून आलेलं नाही. उलट राठोड नॉट रिचेबल असल्याने त्यांच्या भोवतीचा संशय अधिकच वाढला आहे.

मुख्यमंत्री राजीनामा घेणार?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस महासंचालकांना याप्रकरणी पत्रं लिहून सखोल चौकशीची मागणी केली आहे. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलेलं असतानाच शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. महिला अत्याचारावर प्रतिक्रिया देणाऱ्या शिवसेनेच्या महिला नेत्यांकडूनही या प्रकरणावर कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला आहे. मुख्यमंत्री याप्रकरणी राठोडांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाचा निपक्षपातीपणे सखोल तपास करणार का? असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे.

राठोड यांना आत्महत्येची पूर्व कल्पना होती?

व्हायरल क्लिप्समधील आवाज राठोडांचाच असून राठोड बोलीभाषेत संवाद साधत असल्याचा दावा भाजपने केला आहे. हे प्रकरण अधिक गंभीर असून पूजा चव्हाणच्या आत्महत्येची राठोड यांना पूर्व कल्पना होती, असं या क्लिपवरून स्पष्ट होतं, असं भाजपचं म्हणणं आहे. तसेच पूजा प्रकरणाची राठोड यांच्या कुटुंबीयांना माहिती होती का? या क्लिपमधील तरुण विलास आणि अरुण राठोड यांची चौकशी का केली जात नाही? पूजाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला का? असे असंख्य सवालही उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे हे प्रकरण शिवसेनेला अधिकच भोवणार असल्याचं चित्रं दिसत आहे. (will cm uddhav thackeray take action against sanjay rathod?)

संबंधित बातम्या:

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी ठाकरे सरकारवर दबाव वाढला, राठोडांची विकेट पडणार?

मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?

(will cm uddhav thackeray take action against sanjay rathod?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI