AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संत तुकारामांच्या वंशजांकडून योगी आदित्यनाथ यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

"समर्थ रामदास स्वामी नव्हे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते", असा दावा प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी केलाय. ते संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज आहेत.

संत तुकारामांच्या वंशजांकडून योगी आदित्यनाथ यांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 12, 2024 | 9:50 PM
Share

रणजित जाधव, Tv9 प्रतिनिधी, पुणे | 12 फेब्रुवारी 2024 : “समर्थ रामदास स्वामी नव्हे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते”, असा दावा प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी केलाय. ते संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोविंदगिरी महाराजांनी रविवारी आळंदीत बोलताना समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्यावर प्रशांत महाराज मोरे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

प्रशांत महाराज मोरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोविंदगिरी महाराजांची तीव्र निषेध केला. तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते, असा प्रतिदावा प्रशांत महाराज मोरेंनी केला. त्यांनी यासाठी एका अभंगाचा दाखला ही दिला. “प्रशांत महाराज मोरे देहूकरांची ही वैयक्तिक भूमिका आहे”, असं संत तुकाराम महाराजांच्या संस्थानकडून स्पष्ट करण्यात आलंय. मात्र देवस्थानने अद्याप त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले होते?

“महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे. याच महाराष्ट्रात येऊन आज सगळ्या संतांचं दर्शन मला घेता येत आहे आणि शिवरायाच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी मला पाहता आली”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

Follow Us
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत दीपकेच्या भेटीगाठी सुरुच
AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार
Rahul Gandhi | AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार खोटं आहे; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोठा गोंधळ
पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत...
Rohit Pawar | पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले धक्कादायक दावे
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये नेमकं काय काय?
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना,
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना, 1 ऑगस्टला... असं काय घडलं?
तुमची दाढी अजून जळतेय...; शिंदेंच्या टीकेला राऊतांचा जोरदार पलटवार
Sanjay Raut UNCUT | तुमची दाढी अजून जळतेय...मिस्टर मिंदे...; शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचा जोरदार पलटवार
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'त्या' फोटोची तुफान चर्चा
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट केला मोठा दावा...
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट नाव घेत केला मोठा दावा, काय घडलं?