डीलिमिटेशन विधेयकाबातब असं काय म्हणाले? पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेसला फोडला घाम

पृथ्वीराज चव्हाण यांनी डीलिमिटेशन विधेयकावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, डीलिमिटेशनला थेट विरोध नसून, राज्यांच्या तुलनात्मक जागांची संख्या बदलू नये. यामुळे दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होऊ शकतो. 1976 पासून जागा गोठवल्याचा संदर्भ देत, चव्हाण यांनी सरकारवर महिला आरक्षणाच्या नावाखाली 'बोगसगिरी'चा आरोप केला आहे.

डीलिमिटेशन विधेयकाबातब असं काय म्हणाले? पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेसला फोडला घाम
prithviraj chavan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 5:07 PM

डीलिमिटेशन विधेयकाला अखेर आज कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे. गेल्यावेळी काँग्रेससह इतर विरोधी पक्षाने या विधेयकाला विरोध केला होता. यावेळीही काँग्रेसचा विधेयकाला विरोध असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डीलिमिटेशन विधेयकावरून मोठी प्रतिक्रिया दिली आहे. डीलिमिटेशनला काँग्रेसचा विरोध नाहीये. परंतु, राज्यांची तुलनात्मक जागांची संख्या बदलण्यात येऊ नये, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.

काँग्रस नेते पृथ्वीराज चव्हाण हे मीडियाशी संवाद साधत असताना बोलत होते. भाजपने अपेक्षेप्रमाणे 29 तारखेला विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन अद्याप स्थगित न केल्यामुळे दोन दिवसांत नवीन अधिवेशन बोलावता आले. त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन नसून पावसाळी अधिवेशनाचाच पुढील टप्पा आहे. कोणालाही विश्वासात न घेता, मागच्या दाराने लपून-छपून परिसीमन (डिलिमिटेशन) विधेयक आणले जात आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Loading...

पण अन्याय नको

विधेयकातील नेमक्या तरतुदी पाहिल्याशिवाय अंतिम भूमिका घेता येणार नाही, मात्र काँग्रेसचा परिसीमनाला विरोध नाही. परिसीमन करायचे असेल तर नक्की करा. परंतु राज्यांची तुलनात्मक जागांची संख्या बदलू नका. जेणेकरून कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही, असं चव्हाण यांनी म्हटलं.

ही तर बोगसगिरी

महिला आरक्षण आणण्यासाठी डिलिमिटेशन करत आहोत” असा जो दावा केला जात आहे, ती ‘बोगसगिरी’ आणि ‘खोटारडेपणा’ असून त्यातून सरकार थापा मारून भारताच्या जनतेची फसवणूक करत आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला आहे.

दक्षिणेवर अन्याय होऊ नये म्हणून…

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यानी परिसीमनाचा ऐतिहासिक आणि घटनात्मक संदर्भ दिला. परिसीमन ही मूळ घटनेतील तरतूद असून 1951, 1961 आणि 1971 च्या जनगणनेनंतर परिसीमन झाले होते. प्रत्येक जनगणनेनंतर राज्यांच्या लोकसभेतील जागांची तुलनात्मक संख्या बदलत राहिल्यास दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होईल, हे ओळखून 1976 मध्ये इंदिरा गांधी यांनी 1971 च्या जनगणनेनुसार लोकसभेच्या जागांची संख्या 25 वर्षांसाठी (उदा. महाराष्ट्राच्या 48, उत्तर प्रदेशच्या 80 जागा) गोठवण्याचा निर्णय घेतला. 2001 मध्ये हा कालावधी संपल्यानंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आणखी 25 वर्षांसाठी जागा गोठवण्याचा निर्णय कायम ठेवला, जो आता 2026 मध्ये पूर्ण होत आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us