शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात, 4 जण ठार

पुणे अहमदनगर महामार्गावर भरधाव वेगाने पुण्याहून नगरकडे येणाऱ्या मालवाहू ट्रकने छोटा टेम्पो आणि कंटेनरला धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. आमदाबाद येथील 16 जण हे शनीशिंगापूरहून देवदर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात झाला.

शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात, 4 जण ठार
पुणे-नगर महामार्गावर झालेला भीषण अपघात
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Mar 23, 2023 | 11:33 AM

अहमदनगर : पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला. देवदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा हा अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. अहमदनगर शहराच्या कामरगावमध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातातील 11 जणांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. जखमींना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात निधन झालेले सर्व शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे रहिवाशी आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

कसा झाला अपघात

आमदाबाद येथील 16 जण हे शनीशिंगापूरहून देवदर्शनाहून घेऊन माघारी परतत होते. पुणे अहमदनगर महामार्गावर भरधाव वेगाने पुण्याहून नगरकडे येणाऱ्या मालवाहू ट्रकने छोटा टेम्पो आणि कंटेनरला धडक दिली.  बुधवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघात 4 जण ठार झाले तर 11 जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका 14 वर्षीय बालकाचा समावेश आहे. मृतांमध्ये राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवगड आणि शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन पुण्याकडे हे भाविक निघाले होते.

पुणे-बंगळूर महामार्गावरही अपघात


पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. साताऱ्यातील गुळुंब फाट्याजवळ सुरू असलेल्या पुलाचे बांधकामाजवळ हा अपघात झाला. दुचाकीस्वारास पुलाचे काम लक्षात न आल्याने दुचाकीवरुन प्रवास करणारे दोघे ओढ्यामधील पुलाच्या भिंतीवर आदळले. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती भुईंज पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री उशिरा दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही युवक वाई येथील रहिवासी आहे.