पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 22 कोटींच्या जुन्या नोटा, RBI चा नोटा बदलून देण्यास नकार

बॅंकेकडे जमा झालेल्या तब्बल 576 कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा सुरुवातीची सात महिने बॅंकेतच पडून होत्या. अखेर 554 कोटी रुपयांच्या नोटा बदलून मिळाल्या. तोपर्यंत बॅंकेचे 50 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 22 कोटींच्या जुन्या नोटा, RBI चा नोटा बदलून देण्यास नकार
500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 10:24 AM

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक तब्बल 22 कोटी 25 लाख रुपयांच्या जुन्या नोटा सांभाळत आहे. रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर बँकेने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्री जुन्या नोटांमुळे बॅंकेला मोठा आर्थिक फटका बसल्याची माहिती आहे. (Pune District Central Cooperative Bank PDCC has 22 crores old currency RBI denies to exchange notes)

22 कोटी 25 लाखांच्या जुन्या नोटा

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 22 कोटी 25 लाख रुपये किमतीच्या जुन्या नोटा आहेत. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने या नोटा बदलून देण्यास बँकेला स्पष्ट नकार दिला आहे. बॅंकेकडे जमा झालेल्या तब्बल 576 कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा सुरुवातीची सात महिने बॅंकेतच पडून होत्या. अखेर 554 कोटी रुपयांच्या नोटा बदलून मिळाल्या. तोपर्यंत बॅंकेचे 50 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. याच नोटांपैकी शिल्लक असलेल्या 22 कोटी 25 लाख रुपयांच्या जुन्या नोटा अद्यापही बॅंकेला बदलून मिळू शकल्या नाहीत.

70 ते 80 कोटी रुपयांची आर्थिक झळ

जुन्या नोटा बदलून मिळाव्यात म्हणून पीडीसीसी बॅंकेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु कोरोनामुळे न्यायालयाचा अंतिम निकाल बाकी आहे. यामुळे बॅंकेने या जुन्या नोटा चक्क लॉकरमध्ये ठेवल्या आहेत. वाळवी आणि अन्य किडीपासून नोटांचा बचाव केला जात आहे. या जुन्या नोटांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांची आर्थिक झळ सोसावी लागत असल्याची माहिती आहे.

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी

8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8.30 वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याला सर्वसामान्यपणे नोटाबंदी असे म्हटले जाते. त्यानुसार रात्री बारा वाजल्यापासून 500 आणि एक हजार रुपयांच्या तत्कालीन नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. 30 डिसेंबर 2016 पर्यंतच ग्राहकांना बॅंक खात्यात जुने चलन जमा करुन नव्या नोटा नेण्याची मुदत देण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

मुलांच्या नावे भविष्यकालीन गुंतवणूक, कर सवलत मिळणार का? नियम काय?

विमा पॉलिसीमध्ये ‘बेनेफिशियल नॉमिनी’चा नवा नियम; याच व्यक्तींना मिळू शकतील नॉमिनीचे लाभ

(Pune District Central Cooperative Bank PDCC has 22 crores old currency RBI denies to exchange notes)

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.