
लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस राहिलेत. बाप्पा घरी येणार म्हणून उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. खरेदीसाठी बाजारामध्ये गर्दी झालीय.

गणेशोत्सवात उत्साह ओसंडून वाहत असतो. हा सार्वजनिक उत्सव असल्याने काही नियमही पाळावे लागतात. पुण्यातील गणपती विसर्जनाबाबतची नियमावली समोर आली आहे. यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेवर बंदी घालण्यात आली आहे.

एनजीटी खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या आदेशानंतर पुण्यातील सणासुदीच्या वेळी ध्वनी नियंत्रणाचे अनेक उपाय अनिवार्य केलं आहेत. यात गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

ऐन गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एनजेटीच्या पश्चिम खंडपीठ यांनी 30 ऑगस्ट रोजी अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. सुमेरा अब्दुल आली यांनी मुंबईतील याची कडक अंमलबजावणी करण्याचा आवाहन केला आहे.

गणपती विसर्जनात डीजेवर डिसेबलची बंदी घालण्यात आली आहे. डीजेचा आवाज हा आरोग्यासाठी धोकादायक असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकीच्या काळात डीजे वापरावर बंदी घालण्यात आलीय.