Pune MLC Election BJP Result 2026 : पुण्यातून भाजपने मिळवला पहिला मोठा विजय, एकनाथ शिंदेंची चाल फसली

Pune MLC Election BJP Result 2026 : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपसाठी चांगली बातमी आली आहे.

Pune MLC Election BJP Result 2026 : पुण्यातून भाजपने मिळवला पहिला मोठा विजय, एकनाथ शिंदेंची चाल फसली
kaustubh gawade vs Eknath shinde shivsena sachin sanap
| Updated on: Oct 28, 2026 | 12:51 PM

पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे. शिक्षक आणि पदवीधरसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून पुण्याची जागा चर्चेत होती. पुण्याच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरुन एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये तीव्र मतभेद होते. शिवसेनेने इथून मंगेश चिवटे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांना एबी फॉर्म दिला होता. पण ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरुन उमेदवारी मागे घेतली होती. त्यानंतर शिवसेनेत अंतर्गत खलबत झाली व शिंदे सेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला. त्यामुळे पुण्यात शिक्षक मतदारसंघाचा निकाल काय लागणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. अखेर पुण्याच्या शिक्षक मतदारसंघातून भाजपं उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेना पुरस्कृत सचिन सानप यांचा पराभव केला आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना बाद घोषित करण्यात आलं. त्यांना 8 हजार 965 मतं मिळाली.

27 व्या फेरीनंतर शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांना 20,118 मतं मिळाली. सचिन सानप यांना 13,642 आणि सावंत यांना 12687 मतं मिळाली. पुणे शिक्षक मतदारसंघासाठीचा मतांचा कोटा ठरला होता. एकूण 51 हजार 511 मत वैध ठरली ठरली. शिक्षक मतदार संघासाठी 25 हजार 756 मतांचा कोटा ठरला होता. अभिजीत बिचुकले सुद्धा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढत होते. त्यांना फक्त 19 मतं मिळाली. त्यामुळे ते आधीच बाद झाले.

Loading...

शिंदेंची चाल फसली

एकनाथ शिंदे शिवसेनेचे पुणे शिक्षकची जागा हवी होती. त्यासाठी शिंदे यांच्या सूचनेनुसार मंगेश चिवटे मागच्या दोन ते तीन वर्षांपासून तयारी करत होते. शिंदे सेनेने भाजप उमेदवाराला हरवून ताकद दाखवून देण्याची रणनिती आखलेली. पण एकनाथ शिंदे शिवसेनेचे डाव यशस्वी होऊ शकला नाही. भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे आरामात निवडून आले.

अखेर 29 तासांनी पहिला निकाल आला

पुणे पदवीधर, अमरावती शिक्षक, नागपूर पदवीधर आणि छत्रपती संभाजीनगरची मतमोजणी अजूनही सुरु आहे. 23 ऑक्टोंबरला मतदान झालेलं. काल सकाळी 8 वाजल्याापसून मतमोजणी सुरु होती. अखेर 29 तासांनी पहिला निकाल आला.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us