AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: अभिषेकमुळे सर्वांची Mental Health बिघडलीये, इशान किशनने असा आरोप का केला? पाहा Video

Ishan Kishan And Abhishek Sharma Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी-३० सामना रंगजा जो भारतीय संघाने जिंकला. आता यानंतर इशान किशनने अभिषेक शर्माची कशी शाळा घेतली ते व्हायरल व्हिडिओमध्ये पाहा...

IND vs NZ: अभिषेकमुळे सर्वांची Mental Health बिघडलीये, इशान किशनने असा आरोप का केला? पाहा Video
| Updated on: Oct 28, 2026 | 1:11 PM
Share

IND vs NZ 3rd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी-२० सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला. या विजयात सर्वात मुख्य भूमिका ही अभिषेक शर्माने बजावली. अभिषेक शर्माने कालच्या सामन्यात ३८ चेंडूत ११३ धावा केल्या. अभिषेकने शतकी खेळी खेळली आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. आता यानंतर इशान किशनने अभिषेकची शाळा घेतली. अभिषेकसोबतचा व्हिडिओ शेअर करत इशान किशन काय म्हणाला ते पाहा…

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या स्फोटक फलंदाजीने क्रिकेट जगताला चकित केले. अभिषेकने अवघ्या ३८ चेंडूंमध्ये ११३ धावांची धडाकेबाज खेळी करत किवी गोलंदाजांना झोडपून काढले. त्याने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील तिसरे टी२० शतक होते. मैदानावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांना झोडपल्यानंतर, अभिषेक शर्माने ध्यानस्थ मुद्रा धारण करून आपल्या खास शैलीत शतकाचा आनंद साजरा केला.

या ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय संघाची बस हॉटेलकडे परतत असताना, यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशनने अभिषेक शर्माला घेत एक व्हिडिओ शूट केला आहे. ईशानने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये, ईशान किशन अभिषेकच्या आक्रमक फलंदाजीची आणि त्याच्या शांतपणे केलेल्या सेलिब्रेशनची खिल्ली उडवत म्हणतो, “तो इतरांचे मेन्टल हेल्थ बिघडवून स्वतः ध्यान करतो.” याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ईशान किश दोन सामने खेळू शकलेला नाही. पहिला सामना खेळला यानंतर दुसरा तिसऱ्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. त्याला दुखापत असल्याने प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसावं लागले. आता त्याची रिप्लेसमेंट म्हणून वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली. कालच्या सामन्यात वैभवनेही स्फोटक खेळी खेळली. वैभवचे अर्धशतक हुकले असले तरीही त्याने अभिषेकला साथ देत मैदानात धुमाकुळ घातला. पुढील सामन्यात तरी वैभवला पुन्हा संधी मिळते की ईशान किशन संघात परततो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
Kaustubh Gawde MLC Result : कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गुलालाची उधळण
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी