Pune News | घरात गणपतीसाठी लावली लायटींग, रात्री शॉट सर्किट झाला अन् होत्याचे नव्हते झाले

Pune News | पुणे जिल्ह्यात गणरायच्या स्वागत सर्वत्र उत्सहात झाले. मंगळवारी गणराया घराघरात स्थापन झाला. गणरायाच्या स्वागतासाठी विविध प्रकारची तयारी केली गेली. परंतु पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

Pune News | घरात गणपतीसाठी लावली लायटींग, रात्री शॉट सर्किट झाला अन् होत्याचे नव्हते झाले
Pune accident
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 24, 2023 | 12:57 PM

सुनिल थिगळे, राजगुरुनगर, पुणे | 24 सप्टेंबर 2023 : बघता बघता गणेशोत्सवाचे सहा दिवस झाले आहेत. गणरायाच्या आगमनाच्या महिन्याभरापूर्वीपासून घरघरात आणि सार्वजनिक मंडळात तयारी सुरु होती. सजावटी करण्यासाठी लगबग सुरु होती. मंगळवारी गणेश चतुर्थीला श्रीच्या विधिवत स्थापन घराघरात झाली. गणेश उत्सवाचा हा उत्सव पुणे शहरासह राज्यात सर्वत्र सुरु असताना एक धक्कादायक घटना घडली. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी येथे ही घटना घडली.

काय घडली घटना

खेड तालुक्यातील खरपुडी येथील युवक वैभव जगन्नाथ गरुड (वय ३५ ) यांच्या घरी गणरायाची स्थापना झाली. त्यांनी आणि परिवाराने सजावटीचे काम केले होते. सजावट करताना विजेची माळही लावली होती. शनिवारी रात्री विजेची माळ सुरु ठेऊन ते गणपतीजवळ झोपले होते. त्यावेळी मोठी दुर्घटना घडली. त्यांच्या घरात विजेच्या माळेचे शॉट सर्किट झाले. सर्व जण झोपले असताना ही घटना घडली. त्यामुळे घरात आग वेगाने पसरली. काही कळण्याचा आत आगीने रौद्ररुप धारण केले. घरच्या मंडळींना काहीच संधी मिळाली नाही. या अपघातात वैभव गरुड याचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

वैभव सर्पमित्र म्हणून होता प्रसिद्ध

मध्यरात्री लागलेल्या या आगीत घरातील साड्या आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. गादीवर झोपलेल्या वैभव गरुड यांचा जळून मूत्यू झाला. वैभव हा सर्पमित्र म्हणून या परिसरात प्रसिद्ध होता. गाव आणि परिसरात कुठेही साप निघाला की वैभवला फोन येत होते. वैभव ते साप पकडून जंगलात सोडत होता. त्याचे सर्पप्रेम मित्रांना माहीत होते. परंतु शॉट सर्किटमुळे झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा अनेकांना धक्का बसला आहे.

कुटुंबीय बचावले

शार्ट सर्किटच्या या घटनेच्या वेळी वैभव गरुड हा गणपतीची आरास असलेल्या खोलत झोपला होता. त्यावेळी घरात त्यांची पत्नी आणि दोन मुली होत्या. त्या दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. आग लागली तेव्हा ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना बाहेर काढले. यामुळे त्या तिघे बचावल्या. परंतु वैभवचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.