पुण्याची हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तयार, उद्घाटनाला कधी मिळणार मोदींची तारीख…

पुण्याच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे बांधकाम होऊन ती केव्हापासून सज्ज झाली आहे. मात्र, तिच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसल्याने पुणेकर कातावले आहेत.

पुण्याची हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तयार, उद्घाटनाला कधी मिळणार मोदींची तारीख...
pune metro news
| Updated on: Aug 16, 2026 | 10:00 PM

पुणेकरांची रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची क्षमता असलेला शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो – ३ चा १३.३ किमीचा टप्पा बांधून तयार आहे. हा १२ स्थानकांच्या मार्गाचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. या मार्गामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी या प्रवासाला लागणारा दीड तासांचा वेळ आता ४५ मिनिटांवर येणार आहे.मात्र, सर्व काही तयार असूनही या मार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसल्याने पुणेकर कातावले आहेत. एकीकडे रस्ते अपघाताने बळी जात असताना मेट्रोसारखा पर्यावरण स्नेही मार्ग केवळ पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाकडून तारीख मिळत नसल्याने रखडल्याचे बोलले जात आहे.

पुणे मेट्रो लाईन – तीन हा मेट्रो मार्ग देशातील मोजक्या काही शहरात असलेल्या डीसी ७५० व्होल्ट थर्ड रेल इलेक्ट्रीफिकेश सिस्टीमवर चालणार आहे. यात हिंजवडी ते शिवाजीनगर कॉरिडॉरवर पहिल्यांदा पुणे शहरात असे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. ज्यात मेट्रोला वीज पुरवण्यासाठी ओएचईचा वापर न होता थेट रुळांमधूनच करंट मिळणार आहे. कोलकाता मेट्रो, बंगळुरु नम्मा मेट्रोनंतर हे तंत्रज्ञान प्रथमच पुण्यात वापरले जाणार आहे. त्यामुळे इतकी सोयीची मेट्रो संपूर्ण बांधून तयार असताना केवळ उद्घाटनाअभावी प्रवाशांच्या सेवेपासून वंचित आहे. या मेट्रोच्या उद्घाटनाला पीएमओ कार्यालयाकडून तारीख मिळत नसल्याने तिचे उद्घाटन रखडल्याचे म्हटले जात आहे.

पुणेकरांची लवकरच वाहतूकीच्या कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. पुण्याच्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो – ३ चा १३.३ किमीचा माण ते आर.के. लक्ष्मण म्युझियम हा १२ स्थानकांचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. हा कॉरिडॉर आता डिस्ट्रीक्ट कोर्टपर्यंत वाढवला जात असल्याने तो भविष्यात महा मेट्रो नेटवर्कशी जोडला जाणार आहे. पुणे मेट्रो लाईन-३ सुरु झाल्यानंतर सध्या शिवाजीनगर ते हिंजवडी या प्रवासाचा दीड तासांचा वेळ केवळ ४५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेची बचत होणार असून प्रवाशांची प्रदुषण, धुळ आणि वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

नव्या ओएचई न उभारता थेट रुळांत करंच सोडण्याचा नव्या तंत्रामुळे ओव्हरहेड वायरचा आणि देखभालीचा खर्च वाचतो. तसेच पॉवर फेल होण्याचा धोका टळतो. या नव्या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना ट्रेनची जास्त वेळ पाहावी लागत नाही. ओव्हरहेड वायर तंत्रज्ञानाच्या तुलनेत ट्रेनच्या फेऱ्या वाढतात. पुणे मेट्रो लाईन -३ मुळे हिंजवाडा येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, वाकड, बाणेर, बालेवाडी, युनिव्हर्सिटी सर्कल आणि शिवाजीनगर सारखे महत्वाचे भाग जोडले जाणार आहे.थर्ड रेल सिस्टीम सिस्टीम कम्युनिकेश बेस्ड ट्रेन कंट्रोल ( CBTC ) एडव्हान्स डिजिटल सिग्नलिंग टेक्नॉलॉजी या दोन्हींमुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे मेट्रो लाईन – ३ देशातील मोजक्या शहरात असलेल्या डीसी ७५० व्होल्ट थर्ड रेल इलेक्ट्रीफिकेश सिस्टीमवर चालणार आहे. यात हिंजवडी ते शिवाजीनगर कॉरिडॉरवर पहिल्यांदा शहरात असे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. ज्यात ओएचईचा वापर न होता रुळांमधूनच करंट मिळणार आहे. कोलकाता मेट्रो, बंगळुरु नम्मा मेट्रोनंतर हे तंत्रज्ञान पुण्यात वापरण्यात आले आहे.पारंपारिक इलेक्ट्रीफिकेशन सिस्टीममध्ये ओव्हरहेड वायर आणि मास्टवर अवलंबून राहावे लागते. या नव्या तंत्रात रुळांमध्ये पॉवर सप्लाय दिलेला असतो. त्यामुळे ओव्हरहेड वायरचा खर्च आणि देखभालीचा खर्च वाचतो. तसेच पॉवर फेल होण्याचा धोका टळतो.

ट्रेनची जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही

या नव्या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना ट्रेनची जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही. ओव्हरहेड वायर तंत्रज्ञानाच्या तुलनेत ट्रेनच्या फेऱ्या वाढतात. पुणे मेट्रो लाईन -३ मुळे हिंजवाडा येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, वाकड, बाणेर, बालेवाडी, युनिव्हर्सिटी सर्कल आणि शिवाजीनगर सारखे महत्वाचे भाग जोडले जाणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us