कोयताचे स्टेट्स ठेवणे पडले महागात, पाहा मग पोलिसांनी काय केले

| Updated on: Jan 24, 2023 | 1:11 PM

पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत केले आहे. कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट्स ठेवणाऱ्या या नऊ जणांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

कोयताचे स्टेट्स ठेवणे पडले महागात, पाहा मग पोलिसांनी काय केले
Image Credit source: Google
Follow us on

पुणे  : Pune Crime News  कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांनी मोठी (Crime News) कारवाई केली आहे. या गँगचा म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. कोयता गँगमधील १३ जणांवर मकोका लावला आहे. आरोपींच्या शोधासाठी कोंबिंग ऑपरेशन राबवले जात आहे. आरोपींची यादी तयार केली गेली आहे. त्यानंतरही कोयता गँगमधील आरोपींची दहशत कमी होत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत केले आहे. कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट्स ठेवणाऱ्या या नऊ जणांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

नऊ जणांवर कारवाई

कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्या नऊ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यात तेजस संजय बधे (वय १९), उदय सिद्धार्थ कांबळे (वय १९), प्रसाद उर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय १९, तिघेही रा. थेऊर, ता. हवेली), रोहित राजू जाधव (वय २०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), संग्राम भगवान थोरात (वय २८, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), श्याम गुरप्पा जाधव (वय ४३, रा. वानवडी, पुणे) यांचा समावेश आहे. तसेच तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा

पिंपरी-चिंचवडमध्ये धडाका

कोयता घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलीसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. दोघांनी हातात कोयता घेऊन रील्स ठेवल्याचं पिंपरी चिंचवड पोलीसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. दोघांची कसून चौकशी केली. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोघांचा व्हिडिओ बनवला, या व्हिडिओमध्ये आमची चूक झाली, असे परत होणार नाही, असा आशयाचा व्हिडिओ तयार केला.  त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईची जोरदार चर्चा होत होत आहे. तसेच सोशल मीडियावर दोन्ही व्हिडिओ शेअर केले जात आहे.

आरोपींना लावला मकोका

पोलिसांनी आता कोयता गँगमधील १३ जणांवर मकोका लावला आहेत. त्यात म्होरक्या समिर लियाकत पठाण याचा समावेश आहे. समिर लियाकत पठाण (वय-२६ हडपसर, पुणे), शोएब लियाकत पठाण (वय २०, हडपसर पुणे) , गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार, (वय २२ मांजरी, पुणे, प्रतिक ऊर्फ एस के हनुमत कांबळे (वय २० मांजरी, पुणे), गितेश दशरथ सोलनकर (वय २१ हडपसर पुणे), ऋतिक संतोष जाधव, (वय- १९ मांजरी, पुणे ), साई राजेंद्र कांबळे, (वय-२० मांजरी, पुणे), ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले (वय २४ मांजरी, पुणे) , ऋतिक सुनिल मांढरे, (वय २२ मांजरी रोड,हडपसर पुणे १० ), प्रतिक शिवकुमार सलगर, (वय १९ मांजरी, पुणे) तसेच इतर आरोपी अल्पवयीन आहेत.