TET Exam : तुकाराम सुपे, सावरीकर, देशमुखनं कोट्यवधी घेतले, आणखी आरोपींचा सहभाग, लिंक वाढणार: अमिताभ गुप्ता

| Updated on: Dec 17, 2021 | 1:54 PM

तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta ) यांनी दिली आहे.

TET Exam : तुकाराम सुपे, सावरीकर, देशमुखनं कोट्यवधी घेतले, आणखी आरोपींचा सहभाग, लिंक वाढणार: अमिताभ गुप्ता
अमिताभ गुप्ता
Follow us on

पुणे: पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर, म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर महाटीईटी (MahaTET) परीक्षेसंदर्भात धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. म्हाडा पेपर फुटी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यात तपास करताना टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कालरात्री गुन्हा दाखल केलाय. तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta ) यांनी दिली आहे.

जानेवारी 2020 च्या परीक्षेत गैरप्रकार

महाटीईटी परीक्षेची जाहिरात 2019 मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर याची परीक्षा जानेवारी 2020 मध्ये झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

तुकाराम सुपे यांच्या घरुन 90 लाखांचा ऐवज जप्त

तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख 49 हजार 980 रोख, पाच ग्राम सोन्याचे नाणे, 5 लाख 50000 हजार रुपयांची एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय सुपेने त्याच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचेही माहिती मिळाली आहे, असं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

कोट्यवधी रुपये घेतल्याची कबुली

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. यामुळं टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली होती. तुकाराम सुपे याने 1 कोटी 70 लाख, प्रीतिश देशमुख याने1 कोटी 25 कोटी तर अभिषेक सावरीकर याने 1 कोटी 25 लाख असे एकूण 4 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचं चौकशीत कबुल केलं आहे. त्यापैकी 90 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. यात आणखी आरोपी आहेत, ही लिंक वाढत जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

मोडस ऑपरेंडी काय होती?

ज्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांना ओएमआर रिकामं ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या ओएमआरमध्ये बरोबर उत्तर नोंदवून त्या विद्यार्थ्यांचे निकाल बदलले जात होते.

यावर्षीचा प्रयत्न फसला?

प्रितेश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. धक्कादायक बाब म्हणजे 2021 च्या टीईटी परीक्षेत यातील बरेच विद्यार्थी पात्र असल्याच यादीवरून लक्षात आहे. तपासात हे अपात्र उमेदवार पात्र करण्यासाठी तुकाराम सुपे यांचा सहभाग असल्याचं तपासात उघड झालंय. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 ते 1 लाख रुपये घेतल्याचं समोर आलं आहे.

इतर बातम्या

TET Exam : टीईटी परीक्षेत गैरप्रकाराचा संशय, पुणे पोलिसांकडून MSEC चे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक

फायनली…पुणे-पिंपरी चिंचवडमधील शाळा उत्साहात सुरू, कोणते नियम पाळावे लागणार?

Pune Police said Tukaram Supe and other accused accepted received money in connection in TET exam scam