Salisbury Park renaming : पुण्याच्या सॅलिसबरी पार्कमधील रहिवासी नाराज, नगरसेवकाच्या वडिलांच्या नावास विरोध

| Updated on: Apr 10, 2022 | 1:23 PM

भाजपाचे (BJP) नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या वडिलांच्या नावावर महापालिकेच्या उद्यानाचे नाव देण्याची मागणी केल्याने पुण्यातील (Pune) सॅलिसबरी पार्कमधील (Salisbury Park) रहिवासी नाराज झाले आहेत.

Salisbury Park renaming : पुण्याच्या सॅलिसबरी पार्कमधील रहिवासी नाराज, नगरसेवकाच्या वडिलांच्या नावास विरोध
सॅलिसबरी पार्क येथे निदर्शने करताना रहिवासी
Image Credit source: HT
Follow us on

पुणे : भाजपाचे (BJP) नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या वडिलांच्या नावावर महापालिकेच्या उद्यानाचे नाव देण्याची मागणी केल्याने पुण्यातील (Pune) सॅलिसबरी पार्कमधील (Salisbury Park) रहिवासी नाराज झाले आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांनी शांतपणे निदर्शने केली, दिवे लावले आणि निषेधार्थ कार रॅली काढली. गुल पूनावाला गार्डनजवळील पुणे महानगर पालिका उद्यानाचे उद्घाटन नोव्हेंबर 2021मध्ये झाले. मात्र, गेल्या महिन्यात भिमाले यांनी उद्यानाला त्यांचे वडील दिवंगत यशवंतराव भिमाले यांचे नाव देणारा फलक लावला. पत्रकार विनिता देशमुख यांनी सुरू केलेल्या नवीन बोर्ड हटवण्याच्या ऑनलाइन याचिकेवर 883 स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. 1990च्या दशकात पुणे महापालिकेने हा भूखंड भाडेतत्त्वावर दिल्यावर उद्यानाची गाथा सुरू झाली. ही जमीन आरक्षित बागेसाठी होती, पण ती शहरातील एका नामांकित बिल्डरला देण्यासाठी बेकायदेशीररीत्या रद्द करण्यात आली.

फोरमच्या सदस्यांची पालिकेकडे याचिका

“फोरमच्या सदस्यांनी पालिकेकडे याचिका केली होती आणि न्यायालयात धाव घेतली होती. महापालिकेने जिल्हा प्रशासनाला 6 कोटी रुपये भरून जागा ताब्यात घेण्यास सांगितले होते, परंतु स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले आणि मंचाच्या दबावामुळे सर्वोच्च न्यायालयाने 2015मध्ये भरपाईची रक्कम 18 कोटी रुपये केली होती. भिमाले यांनीही यात मोलाची भूमिका बजावली, असे सॅलिसबरी पार्क रहिवासी मंचाचे अध्यक्ष फैजल पुनावाला म्हणाले.

25 नोव्हेंबरला होणार होते उद्यानाचे उद्घाटन

कचरा विल्हेवाटीसाठी वापरण्यात येणारी जागा महापालिकेने ताब्यात घेतल्यानंतर कामाला सुरुवात झाली. “साथीच्या रोगामुळे कामाला विलंब झाला. 25 नोव्हेंबरला या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. भिमाले यांच्याशी झालेल्या बैठकीत बागेला एखाद्या व्यक्तीचे नाव दिले जाणार नाही किंवा राजकीय पक्षाशी संबंधित असणार नाही यावर पुन्हा चर्चा झाली, असे यावेळी पुनावाला म्हणाले.

‘संघर्ष एका व्यक्तीचा नव्हे तर अनेकांचा’

पुनावाला पुढे म्हणाले, की सॅलिसबरी पार्कमधील रहिवाशांनी भिमाले यांच्या प्रयत्नांची कबुली दिली असताना बागेचे नाव बदलणे हा प्रसिद्धीचा प्रयत्न आहे, असे म्हटले होते. जमिनीमागील संघर्ष हा एका व्यक्तीचा नव्हे तर अनेक लोकांचा संघर्ष होता. भिमाले यांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून आम्ही सुचवले, की भिमाले यांच्यासह बागेसाठी आणि जमिनीसाठी लढलेल्या व्यक्तींच्या नावांचा फलक लावावा. मी त्याच्याशी या कल्पनेबद्दल बोललो आहे.

आणखी वाचा :

Pune local : पुणे ते लोणावळा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; धावणार तीन अतिरिक्त लोकल, वाचा सविस्तर

MNS Vasant More : अखेर वसंत मोरेंना राज ठाकरेंचा रिप्लाय! सोमवारी शिवतीर्थावर बोलावणे

Pune : अनिल बोंडेंच्या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध, राष्ट्रवादीनं केली हडपसर पोलिसांत तक्रार दाखल