Pune Sambhaji Brigade : सिंहगडावरचा ‘तो’ शिलालेख त्वरीत काढा, अन्यथा…; पुण्यात संभाजी ब्रिगेड आक्रमक

पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी हे जाणीवपूर्वक केले आहे. जागरूक शिवप्रेमींनी हे समजून घ्यायला हवे. हा शिलालेख येथून हटवावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलन करणार, असा इशारा यावेळी उत्तम कामठे यांनी दिला आहे.

Pune Sambhaji Brigade : सिंहगडावरचा तो शिलालेख त्वरीत काढा, अन्यथा...; पुण्यात संभाजी ब्रिगेड आक्रमक
सिंहगड किल्ला (संग्रहित छायाचित्र)
Image Credit source: tv9
| Updated on: May 30, 2022 | 4:52 PM

पुणे : खोट्या इतिहासाचे दाखले देऊन सिंहगड (Sinhagad) किल्ल्यावर लावण्यात आलेला शिलालेख काढा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर आणि खोट्या इतिहासावर संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आक्रमक झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्यावर तानाजी मालुसरेंच्या घटनेआधी कोंढाण्याचे नाव सिंहगडच होते, त्याचे पुरावे असल्याचा उल्लेख संबंधित शिलालेखात आहे. या शिलालेखावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. हा शिलालेख खोटा आहे. अशा पद्धतीने खोट्या इतिहासाचे दाखले देऊन शिलालेख (Stone inscription) लावण्यात आला, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांनी केला आहे. नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतरच गडाला सिंहगड नाव शिवाजी महाराजांनी दिले होते, असे त्यांनी सांगितले आहे.

सिंहगडावरचा हाच तो वादग्रस्त शिलालेख, जो काढण्याची मागणी होतेय

‘खोटे लिखाण करून तानाजी मालुसरेंचा अपमान करू नये’

नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर गड आला पण सिंह गेला, असे शिवाजी महाराज म्हणाले होते. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अलिकडच्या काळात गडावरील तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यावेळी पुणे महापालिकेने काही शिलालेख लावले. त्यातील शिलालेखात, एक गड आला आणि एक गड गेला, असे शिवाजी महाराजांनी म्हटल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र महाराज असे म्हटलेले नव्हते, असे संभाजी ब्रिगेडने सांगितले.

काय म्हटलं उत्तम कामठे यांनी?

#Pune : सिंहगडावरचा ‘तो’ शिलालेख त्वरीत काढा, अन्यथा…; पुण्यात संभाजी ब्रिगेड आक्रमक#sambhajibrigade #sinhagadfort #tanajimalusare #Stoneinscription

‘जाणीवपूर्वक केलेले कृत्य’

सिंहगडाचे नाव पूर्वी कोंढाणा होते. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर स्वत: महाराजांनी गडाचे नाव बदलले. मात्र काहीजण जाणीवपूर्वक वाद निर्माण करत आहेत. सभासद बखरीचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. बखर कोणतीही असो, मात्र महाराज जे म्हटले तेच लिहायला हवे होते. पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी हे जाणीवपूर्वक केले आहे. जागरूक शिवप्रेमींनी हे समजून घ्यायला हवे. हा शिलालेख येथून हटवावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलन करणार, असा इशारा यावेळी उत्तम कामठे यांनी दिला आहे.