Pune rain : हे काही पर्यटनस्थळ नाही! वाहतुकीसाठी बंद असतानाही पुणेकरांची भिडे पुलावरून ये-जा, सेल्फीचीही भागवतायत हौस

| Updated on: Jul 13, 2022 | 3:17 PM

दर पावसाळ्यात भिडे पूल पाण्याखाली जातो. आता मागील सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिडे पूल आता पाण्याखाली गेला आहे. याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत. एक तर हा पूल बंद असताना याठिकाणाहून लोक ये-जा करीत आहेत.

Pune rain : हे काही पर्यटनस्थळ नाही! वाहतुकीसाठी बंद असतानाही पुणेकरांची भिडे पुलावरून ये-जा, सेल्फीचीही भागवतायत हौस
बाबा भिडे पुलावर बेजबाबदार नागरिक करताहेत फोटोसेशन
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने काल खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात (Mutha river) पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे शहरातील बाबा भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पुलावर दोन्ही बाजूंनी पोलिसांनी बेरिकेडिंगदेखील केली होते. मात्र आज सकाळपासून पुणेकर नियम न जुमानता भिडे पुलावरून ये-जा करताना दिसत आहेत. नदीपात्रात दोन्ही बाजूला पाणी साचले असतानादेखील पुणेकर मात्र बिंधास्त या भिडे पुलावर (Bhide bridge) फेऱ्या मारत आहेत. काही हौशी पुणेकर तर जीव धोक्यात घालून काठावर सेल्फी काढत आहेत. तर दुसरीकडे मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आणि कचरा वाहून आलेलादेखील पाहायला मिळत आहे. खडकवासला धरणातून (Khadakwasla dam) काल दुपारी एक वाजता 11 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्रातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. कालच हा पूल बंद करण्यात आला.

कडक कारवाईची मागणी

दर पावसाळ्यात भिडे पूल पाण्याखाली जातो. आता मागील सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिडे पूल आता पाण्याखाली गेला आहे. याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत. एक तर हा पूल बंद असताना याठिकाणाहून लोक ये-जा करीत आहेत. वाहनांना पूर्णपणे बंदी आहे. तरीदेखील दुचाकीचालक बिनधास्तपणे येथून वाहने चालवत आहेत. तर एखाद्या पर्यटनस्थळाप्रमाणे काही जण तर सेल्फी काढण्यात मग्न झालेले पाहायला मिळत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशा जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काही जागरूक नागरिक करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

मुसळधार पावसाचा अंदाज

पुण्यात अद्यापही पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने शहरासह धरण परिसरातदेखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण कालच पूर्ण भरले. तर जिल्ह्यातील इतर धरणेही भरण्याच्या स्थितीत आहे. त्याठिकाणाहून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर मुठा नदीपात्रातील पाणीपातळी वाढते. त्यामुळे दरवर्षी भिडे पुलावरून पाणी वाहत आल्यानंतर हा पूल बंद करण्यात येत असतो.