Expressway : नित्याची कोंडी! मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या दीड किलोमीटरपर्यंत रांगा

| Updated on: Aug 27, 2022 | 11:02 AM

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. अपघातही वाढले आहेत. काल स्वागत फलक बसवण्यात आला. मात्र अशाप्रकारे पैशांचा चुराडा करण्यापेक्षा या महामार्गावर किमान सुविधा पुरवण्यात याव्यात, त्यासाठी पैसा खर्च करावा, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.

Expressway : नित्याची कोंडी! मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या दीड किलोमीटरपर्यंत रांगा
अमृतांजन पुलाजवळ लागलेली वाहनांची रांग
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक धिम्यागतीने सुरू असल्याने वाहनांची भली मोठी रांग पाहायला मिळत आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर आल्याने ही वाहतूककोंडी (Traffic jam) आणि वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. विकेंडसाठी जाणारी गावी जाणारे नागरिक त्याचप्रमाणे गणेश भक्तांची वाहने मोठ्या प्रमाणात एक्स्प्रेस वेवर आली आहेत. त्यासोबतच अवजड वाहनांना (Heavy vehicles) या मार्गावर बंदी नसल्याने अतिशय धिम्यागतीने वाहतूक सुरू आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत आहे. त्यात सलग सुट्टया, आगामी गौरी-गणपती उत्सव यामुळे गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

छोटी-मोठी कामे सुरू

सध्या काही छोटी-मोठी कामेदेखील महामार्गावर सुरू आहेत. स्वागत फलक बसवण्यासाठी काल दोन तासांसाठी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र पर्यायी रस्ता असल्याने वाहनचालकांची कोणतीही गैरसोय झाली नाही. काल दुपारी बारा ते दोन असे काम सुरू होते. मात्र जवळपास अडीच तासांनंतर वाहनचालकांसाठी रस्ता मोकळा करण्यात आला होता. या महामार्गावर अधूनमधून वाहतुकीचा अंदाज घेऊन कामे होत आहेत. त्यातील काही कामांवर नागरिकांकडून रोषही व्यक्त करण्यात येत आहे. आवश्यक असलेल्या कामांनाच प्राधान्य दिले जावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

वाहनांच्या रांगा

वाहनचालकांमध्ये नाराजी

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. अपघातही वाढले आहेत. काल स्वागत फलक बसवण्यात आला. मात्र अशाप्रकारे पैशांचा चुराडा करण्यापेक्षा या महामार्गावर किमान सुविधा पुरवण्यात याव्यात, त्यासाठी पैसा खर्च करावा, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत. अपघात झाल्यावर वेळेत मदत मिळत नाही, प्रथमोपचाराची कोणतीही ठोस प्रणाली नाही, नियम मोडणाऱ्या आणि दुसऱ्याचा जीव जाण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना आवर घालणारी यंत्रणा नाही, या सुविधा पहिल्यांदा दिल्या जाव्या, अशी अपेक्षा वाहनधारक करीत आहेत. त्याशिवाय नित्याची वाहतूककोंडी सोडवावी, अशी मागणीही होताना दिसून येत आहे.