AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवाच्या आळंदीत दु:खाची लाट, विद्यार्थ्यांची दिवेआगरची सहल शेवटची ठरली; मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर पालकांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना

देवाच्या आळंदीत दु:खाची लाट पसरली आहे. आळंदीमधील विद्यार्थ्यांची दिवेआगरची सहल शेवटची ठरल आहे. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर पालकांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना झाले होते.

देवाच्या आळंदीत दु:खाची लाट, विद्यार्थ्यांची दिवेआगरची सहल शेवटची ठरली; मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर पालकांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना
alandiImage Credit source: tv9
| Updated on: Oct 02, 2026 | 8:34 AM
Share

रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातलाय. आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. पुण्यातील आळंदी भागात असलेल्या विनर्स अकॅडमीमधील अकरावी आणि बारावी विद्यार्थी आणि शिक्षक असे एकूण 48 जण दिवेआगार सहलीसाठी आले होते. या विद्यार्थ्यांसोबत भयंकर घडलं.  समुद्राला भरती आल्याने अनेकांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू  झाला आहे.

समुद्रातून बुडून मृत्यू झालेल्या 8 विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचे मृतदेह सुरुवातीला श्रीवर्धन जिल्हा उपरुग्णालयात ठेवण्यात आले होते. पहाटे 4 वाजेपर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर 8 मुलांचे मृतदेह आळंदीला पाठवण्यात आले. मुलांचे मृतदेह रुग्णावाहिकेत ठेवताना पालकांना अश्रू अनावर झाले. विद्यार्थ्यांना घेऊन आलेली विद्यार्थ्यांची बस देखील पहाटेच आळंदीला निघाली. मुलांचे मृतेदह पाहिल्यानंतर पालक आणि नातेवाईक एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. या दुर्घटनेनंतर रात्रीच मंत्री आदिती तटकरे हे घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी मृत मुलांचे पालक आणि नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचे सांत्वन केले. या दु:खद घटनेबद्दल मंत्री तटकरे यांनी शोक व्यक्त केला.

42 विद्यार्थ्यांची निघाली होती सहल 

आळंदी येथील विनर्स अॅकाडमीचे तब्बल ४२ विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे गेले होते. या विद्यार्थ्यांमध्ये २५ मुले आणि १७ मुलींचा समावेश होता. दुपारच्या सुमारास काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी पाण्यात बुडाले. या दुर्दैवी घटनेत आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सहलीसाठी गेलेल्या इतर विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आळंदी येथे आणण्यात आले आहे. दुर्घटनेतून बचावलेले 34 विद्यार्थी आळंदीत दाखल झाले आहे. त्यांना घेण्यासाठी पालक आतुरतेने वाट पाहत होते.  या घटनेनंतर आळंदी पोलीस ठाण्यात पालकांची मोठी गर्दी झाली होती. आपल्या पाल्याला सुरक्षितपणे घरी घेऊन जाण्यासाठी पालकांची लगबग सुरू आहे. या घटनेमुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आळंदी बंद 

दिवेआगर दुर्घटनेत आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शुक्रवारी आळंदी बंद ठेवण्यात आलाय. सर्व व्यापारी, व्यावसायिक, संस्था आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होत शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना