Rain : राज्यात पाऊस परतणार, आता आला मुसळधार पावसाचा अंदाज

| Updated on: Sep 03, 2023 | 8:01 AM

IMD Weather forecast : जूननंतर ऑगस्ट महिन्यात पाऊस झाली नाही. यामुळे पावसाची सर्व अपेक्षा सप्टेंबर महिन्यावर आहे. आता पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे.

Rain : राज्यात पाऊस परतणार, आता आला मुसळधार पावसाचा अंदाज
rain
Follow us on

पुणे | 3 सप्टेंबर 2023 : देशात यंदा मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसला. यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातील पावसाने काहीसा दिलासा दिला. आता सप्टेंबर महिन्यातील पावसावर शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. या पावसामुळे रब्बी हंगाम चांगला येईल आणि राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे. राज्यात दडी मारलेला पाऊस आता परतू लागला आहे. पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यात या भागांत मुसळधार पाऊस

कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत जात आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात ४ सप्टेंबरनंतर मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागांत यलो अलर्ट जारी केला आहे, असे पुणे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पुणे परिसरात पावसाचा जोर

उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असणार आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे.

नाशिकमध्ये पाऊस

प्रदीर्घ विश्रांतीनंतर नाशिक परिसरात पाऊस झाला. नाशिकच्या कळवणसह बेज, पिळकोस, भादवणसह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. दोन तास सुरू असलेल्या पावसाने शेतासह सखल भागात पाणी साचले होते. पाऊस परतल्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून आणखी दमदार पाऊस पडण्याची आशा कायम आहे. नाशिकमधील धरणांमध्ये अजून पुरेसा जलसाठा झालेला नाही.

100 वर्षांत देशात अशी परिस्थिती

हवामान विभागाने मागील 100 वर्षांत प्रथमच ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याचे म्हटले आहे. पुणे आणि परिसरात ऑगस्टमध्ये 40 टक्के कमी पाऊस झाला आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात परिस्थिती बदलणार आहे. या महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आयएमडीचे हवामान शास्त्रज्ञ अनुप कश्यपी यांनी व्यक्त केली.