
पुणे – राज ठाकरे माझ्या ह्रदयात राहतील , ट्रे माझे दैवत होते आहेत आणि राहतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर माझी भूमिका मी जाहीर करेल. काल मुंबई येथे मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेले होते. वैजापूर येथील ऑनर किलिंगच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मी गेले होते. त्यावेळी मी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवासेनेचे नेते वरुण देसाई यांची भेट झाली, ती भेट ही सदिच्छा भेट असल्याचेही रुपाली ठोंबरे-पाटील यांनी म्हटलं आहे.
मी संघर्ष करणारी व सर्वसामान्यांवर प्रेमं करणारी कार्यकर्ती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी राज ठाकरे यांना पाहूनच आले. मला कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना मी राजकारण आले. मी माझ्या स्वार्थासाठी राज ठाकरेव मनसेच्या कार्यकर्त्यांना कधीही वाईट बोलणार नाही. पंरतु माझं मत , माझ्या मनातील खदखद , माझे वरिष्ठ नेते आहेत ,त्यांच्या चौकटीत राहून सन्मानीय राज ठाकरे यांच्यापर्यंत माझे मत पोहचवले आहे. मनसेत निस्वार्थी प्रेम करणारे प्रचंड कार्यकर्ते आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मला भरभरून प्रेम दिल मी त्यांच्या कायम ऋणात राहीन.
पुढील निर्णय लवकरच कळवेल
मी कुठतरी जायचं म्हणून मनसेला बदनाम करेल, राज ठाकरेंना बदनाम करेल असे करणार नाही. बदल घडत नसतील तर स्वतःत बदल करायला हवेत. मनसेत काय बदल करायचे हे सांगण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या एवढी मोठी नाही. नवीन कोणत्या पक्षात प्रवेश करणार हा निर्णय अद्याप घेतलेला नाही. हो मला ऑफर आलेल्या आहेत . तो तो निर्णय जाहीर झाला की व्यक्त होईल.
योग्य वेळ आल्यावर उत्तर देईल
वसंत मोरे, संदीप देशपांडे यांच्यासोबत भावंड म्हणून काम केलं आहे. योग्यवेळ आली की त्यांनाही उत्तर देईल. मीही त्यांच्या साच्यात वाढली आहे. ठीक आहे त्यांना वाटले असेल दुःख, एक बंधू म्हणून झाले असतील व्यक्त . पण मी आता त्यांना काही बोलू इच्छित नाही. मला ज्या गोष्टी वाटल्या त्या मी राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे आता त्यात बदल होतील का नाही यावर मी बोलने योग्य नाही. गेले १४ वर्षे मी पक्षात काम केले आहे. या काळात पक्षाने मला खूप काही दिले त्यामुळे हा वादचा नाही की पक्षाने मला काय दिल आणि दिलं नाही.या १४ वर्षात मी केलं काम जनता सांगेल. येत्या काळात ज्या माझ्या कार्यकारी शैलीप्रमाणे मला स्वीकारतील त्यांच्या सोबत जाण्यास मी तयार आहे. मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल, किंवा शिवसेना असेल. अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
Raj Thackeray | राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याची रोकडोबा दर्शनाने सुरुवात
‘जब हम दो साथ खडे, तो सबसे बडे’ मनसे नगरसेवक वसंत मोरेंचे ट्विट होतेय व्हायरल