लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी-शाहांवर घणाघात, आता शेतकरी आंदोलनावर राज ठाकरे काय बोलणार?

| Updated on: Jan 27, 2021 | 1:37 PM

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी-शाहांवर घणाघात, आता शेतकरी आंदोलनावर राज ठाकरे काय बोलणार?
राज ठाकरे शेतकरी आंदोलनावर काय बोलणार?
Follow us on

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. राज यांनी काल पुण्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. पुणे महापालिका (Pune Municiapal corporation election) आणि पक्ष बांधणीसाठी त्यांनी पुणे दौरा केला. पुण्यावरुन मुंबईकडे निघताना राज ठाकरे यांना दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर (Farmers protest Delhi) प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राज ठाकरे यांनी नंतर बोलणार असल्याचं सांगितलं. (Raj Thackeray said, he will speak later on the farmers protest delhi)

राज ठाकरे हे शेतकरी आंदोलनावर नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा  निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली होती. आता राज ठाकरे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनावरुन मोदी-शाहांवर निशाणा साधणार असल्याचं दिसतंय.

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांनी थेट लाल किल्ल्यावर कूच केली. यादरम्यान, ठरलेला मार्ग सोडल्याने शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. या हिंसाचारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 300 पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर हल्ला करुन प्रचंड तोडफोड केली. तर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रचंड हिंसाचार घडला.

यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीने परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली. शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी कालपासून मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरु आहे.

शेतकरी आंदोलनात 300 पोलीस जखमी

राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रचंड धुमश्चक्री पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला (Farmers tractor rally) हिंसक वळण लागलं. शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कूच केली होती. शेतकरी पोलीस झटापटीत 300 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. तर दिल्ली पोलिसांकडून 22 एफआयर दाखल करण्यात आल्या आहेत. सिंघू बॉर्डर आणि लाल किल्ल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

राज ठाकरेंचा पुणे दौरा

राज ठाकरे काल पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी राज ठाकरेंनी पुण्यातील वरिष्ठ मनसे नेत्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मनसे नेते बाबू वागस्कर आणि अनिल शिदोरे उपस्थित होते. येत्या पुणे महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत एकूण 45 मिनिटं चर्चा झाली. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवार होणारी बैठक शुक्रवारी 29 जानेवारीला होईल, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.

(Raj Thackeray said, he will speak later on the farmers protest delhi)

संबंधित बातम्या  

पुण्यात मनसेची मोर्चेबांधणी, राज ठाकरेंचा दोन दिवस पुणे दौरा   

Youth Killed in Tractor Rally: ऑस्ट्रेलियात शिक्षण, तीन दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनात, हिंसाचारात जीव गमावणाऱ्या युवकाची कहाणी  

दिल्ली हिंसाचारात ज्याचं नाव समोर येतंय तो लक्खा सिधाना कोण आहे?