AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल, पण तानाजी सावंत कधीच…; रोहित पवार असं का बोलले?

नवाब मलिक हे अजित पवारांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. त्यावर रोहित पवार यांनी थेट बोलणं टाळलं. आज कोण कुठं आहे, यापेक्षा लढा कसा उभारायला हवा याकडे आमचं लक्ष आहे. आलेल्या बातम्यांवर भाष्य करणं योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले.

अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल, पण तानाजी सावंत कधीच...; रोहित पवार असं का बोलले?
rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2023 | 9:42 AM
Share

रणजीत जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 8 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल, पण सावंत कधीच भिकारी होणार नाहीत. अगदी असंच सध्या सुरू आहे. म्हणून तर ते स्वतःचाच विचार करत आहेत. रुग्ण मृतांबाबत मला काहीच विचारू नका असं आरोग्य मंत्री म्हणत आहेत. मग जबाबदारी कुणाची? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

अजित पवार यांना मुख्यमंत्री करू असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पुन्हा कधी तरी मुख्यमंत्री करू असंच ते म्हणणार. आत्ताच मुख्यमंत्री करू, आत्ताच न्याय मिळवून देऊ, आत्ताच मृत रुग्णांना मदत करू, असं ते म्हणणार नाहीत. नेहमीच पुन्हा करू असं त्यांचं म्हणणं असतं. यापूर्वीही त्यांनी पुन्हा या शब्दावर जोर दिला होता, असा टोला रोहित पवार यांनी फडणवीस यांनी लगावला आहे.

भुजबळांनी विसरू नये

तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात. तर मीही राष्ट्रवादीचा संस्थापक प्रांताध्यक्ष होतो, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. भुजबळ यांच्या टीकेचा रोहित पवार यांनी समाचार घेतला. आज भुजबळ काहीही बोलतील, पण त्यांनी हे विसरू नये, त्यांनाच पवार साहेबांनी अनेक मंत्री पदं दिलेली आहेत, असं रोहित पवार म्हणाले.

आता आत्मक्लेशाची गरज नाही

अजितदादांच्या सभेत आता शरद पवार यांच्या ऐवजी यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादांच्या सभेत यशवंत चव्हाण साहेबांचे फोटो दिसत आहेत. त्याच चव्हाण साहेबांना पवार साहेबानी गुरू मानलं. त्यांच्या प्रेरणेने पवार साहेब राजकारण करतात. आता पवार साहेबांचा फोटो वापरता येईना म्हणून चव्हाण साहेबांचा फोटो वापरला जात आहे. आता चुकीच्या पद्धतीने काम केलं तर कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची गरज नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या फोटो समोर बसून केलं तरी चालेल, असा चिमटा त्यांनी काढला.

ते अशोभनीय

ट्रोल करणं हे त्यांचं काम आहे. आज हे लोक वडिलांनाच घरातून बाहेर काढू लागलेत. आजवर पवार साहेबांनी अनेकांना मंत्री पद दिली. अधिकारही दिले. त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केला नाही. पण आज ते विरोधी गटात गेले अन् पवार साहेब आमचं चालून देत नव्हते, असं म्हणत आहेत. पवार साहेब हे हुकूमशाही पद्धतीने काम करतात असं म्हणतात, हे अशोभनीय आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच