तुम्ही हरले तर पावती माझ्या नावावर फाटेल, मी हरलो तर तुमच्या घराजवळ… गुलाबराव पाटील असं काय म्हणाले?

साडेचार वर्षे हा माणूस पालकमंत्री राहिला. त्यांनी कधी हातात माईक घेतला नाही. डीपीडीसीच्या झालेल्या सर्व सभा एकनाथ खडसेंनी चालवल्या, असा पलटवार मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर केला.

तुम्ही हरले तर पावती माझ्या नावावर फाटेल, मी हरलो तर तुमच्या घराजवळ... गुलाबराव पाटील असं काय म्हणाले?
gulabrao patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 9:00 AM

जळगाव | 8 ऑक्टोबर 2023 : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम सर्वच राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम सुरू केलं आहे. तुम्ही हरला तर पावती माझ्या नावावर फाटेल. पण मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

जळगाव शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले. जिल्हा परिषद, पंचायत समिती सुद्धा ताकदीने लढू असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या. जळगाव ग्रामीण मतदार संघात 32 पैकी 25 ग्रामपंचायतीवर भगवा फडकवा. तुम्ही हरले तर त्याची पावती माझ्या नावावर फाटेल. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत जर मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ तुटतील, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

शिंदे-फडणवीस निर्णय घेतील

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. तेच त्यावर निर्णय घेतील, असं पाटील म्हणाले. सरकार मराठा आरक्षण आंदोलनात शेवटचा डाव टाकून फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता. त्यावर पाटील बोलत होते.

महत्त्व देत नाही

संजय राऊत म्हणजे घिसीपीटी कॅसेट आहे, तिला महत्व देत नाही. राऊत यांच्या म्हणण्याला मी फार महत्त्व देत नाही, असं सांगत पाटील यांनी राऊत यांच्या टीकेवर अधिक प्रतिक्रिया देणं टाळलं. राऊत यांनी फडणवीस यांचा उल्लेख मदारी असा केला होता. त्यावर ते बोलत होते.

शेकडो तरुणांचा पक्षप्रवेश

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील विविध समाजाच्या शेकडो तरुणानी गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. जळगावात नवनियुक्त संपर्कप्रमुख मनोज हिवरे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान हा प्रवेश सोहळा पार पडला. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना शिंदे गटाने शक्तिप्रदर्शन केले.

Non Stop LIVE Update
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.