AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकविरुद्ध अभिषेक शर्मा खेळणार की नाही ? वरुण चक्रवर्तीचा मोठा खुलासा

Abhishek Sharma Fitness : येत्या 15 फेब्रुवारीला, रविवारी, भारत टी-20 वर्ल्डकपमधील तिसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. मात्र अभिषेक शर्मा आजारी असल्याने त्याच्या सहभागाबद्दल साशंकता आहे. त्याच्या फिटनेसबद्दल भारतीय स्पिनर वरुण चक्रवर्तीने मोठी अपडेट दिली आहे.

IND vs PAK :  पाकविरुद्ध अभिषेक शर्मा खेळणार की नाही ? वरुण चक्रवर्तीचा मोठा खुलासा
अभिषेक शर्मा पाकविरुद्ध खेळणार की नाही ? Image Credit source: PTI
| Updated on: Feb 13, 2026 | 10:19 AM
Share

T20 World Cup 2026, Abhishek Sharma Fitness : टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026) मध्ये टीम इंडियाने (Team India) दमदार सुरुवात केली आहे. भारताने दोन सामने खेळले आणि दोन्ही जिंकलेत, त्यामुळे टीम इंडिया आपल्या गटात अव्वल स्थानावर आहे. मात्र असं असलं तर ग्रुप स्टेजमध्ये भारताचा सर्वात मोठा सामना, हा 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे, ती म्हणजे अभिषेक शर्माच्या आरोग्याबद्दल. पोटाच्या आजारामुळे तो नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकला होता. मग आता पाकिस्तानविरुद्धच्या या मोठ्या मॅचमध्ये तरी खेळू शकेल की नाही, मैदानात उतरेल की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. टीम इंडियाच्याच वरूण चक्रवतीने याबद्दल उत्तर दिलं आहे.

अभिषेक शर्माच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स

टी-20 वर्ल्डकपमध्ये अमेरिकेविरुद्धच्या सामन्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या सलामीवीर अभिषेक शर्माच्या तंदुरुस्तीबद्दल भारतीय स्पिनर, वरुण चक्रवर्तीने सकारात्मक अपडेट दिले आहे. त्या सामन्यात तो डकवर आऊट झाला आणिला आणि नामिबियाविरुद्धचा सामनाही तो खेळू शकला नाही. मात्र आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि तो सामन्यादरम्यान डगआउटमध्ये उपस्थित होता. नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर, वरुण चक्रवर्ती यानेही आता एक महत्त्वाची अपडेट दिली. अभिषेकने नामिबियाच्या सामन्यापूर्वी सराव केला होता आणि त्याची प्रकृती चांगली दिसत होती. त्यामुळे आता आगामी सामन्यांमध्ये अभिषेक खेळेल अशी आशा त्याने व्यक्त केली.

वरुण चक्रवर्ती म्हणाला, “मला वाटतं तो पुढचा सामना खेळेल. मला खात्री नाही, पण मी त्याच्याशी बोललो, तो ठीक आहे असं दिसतंय. त्याने आज काही काळ सरावही केला. तो लवकरच पुनरागमन करू शकतो” असं त्याने सांगितल्याचं वरूणने नमूद केलं. मात्र, अभिषेक आणखी एक किंवा दोन सामने गमावू शकतो असं भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉसच्या वेळी सांगितलं होतं. त्यामुळे, जर अभिषेक कोलंबोला पोहोचेपर्यंत निरोगी असेल आणि खेळण्यास तयार असेल तर तो स्पर्धेतील सामन्यांत दिसू शरतो.

विजयासह मिळणार सुपर-8 चं तिकीट

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धचा पुढचा सामना हा हाय-व्होल्टेज सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा असेल. विजयामुळे सुपर ८ मध्ये स्थान निश्चित होईल. सध्या, भारतीय संघ दोनपैकी दोन सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर पाकिस्ताननेही त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. त्यांचेही चार गुण आहेत, म्हणजेच हा सामना जिंकणारा संघ थेट सुपर 8 साठी पात्र ठरेल. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार हे नक्की…

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक