उंच उंच लाटा… समुद्र उसळला…मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
मुंबईत गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठीही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, समुद्राला मोठी भरती आल्याने किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दादर, परळ, सायन, कुर्ला, अंधेरी आणि बांद्रा परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून लोकल सेवांवरही किरकोळ परिणाम झाला. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना अडचणींचा सामना करावा लागला.
मुंबई महानगरपालिकेकडून आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत. समुद्र किनाऱ्यावर नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मच्छीमारांना देखील पुढील 48 तास समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
Published on: Jul 01, 2026 02:56 PM
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब