Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही…शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
राज्यातील राजकारणात सचिन अहिर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा जोर धरत असतानाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भूमिकेवर भाष्य केले. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सध्या अधिक प्रतिक्रिया देणे टाळले असले, तरी आगामी जबाबदारीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

माध्यमांशी बोलताना सचिन अहिर म्हणाले, “मी गेल्याशिवाय सर्वांना कळणार नाही. माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवत ही संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सभागृहाचे कामकाज सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निष्पक्षपणे चालवण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे सध्या या विषयावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
“प्रथम संबंधित प्रस्ताव मंजूर होऊ द्या, त्यानंतर माझी सविस्तर भूमिका मांडेन,” असेही सचिन अहिर यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना आणखी वेग आला असून पुढील काही दिवसांत या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 01, 2026 01:16 PM
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा