अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार सचिन अहिर यांना महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली. सचिन अहिर हे ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्याचं सांगितलं जातं.
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार सचिन अहिर यांना महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली. सचिन अहिर हे ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्याचं सांगितलं जातं. आता सचिन अहिर यांची आज (१ जुलै) रोजी उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून जगन्नाथ (ज. मो.) अभ्यंकर यांनीही अर्ज भरला होता, परंतु नंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली.
यावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाष्य केले. त्यांनी उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल सचिन अहिर यांचे अभिनंदन केले. त्यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय कारकिर्दीबाबतही सांगितले. इतकेच नाही तर त्यांच्या राष्ट्रवादीतील कार्यबाबतही सांगितले. अहिर यांच्या बाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘आदरणीय अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं होतं’. सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सचिन अहिर यांना अभिनंदन केले तसेच शुभेच्छा दिल्या.
Published on: Jul 01, 2026 03:59 PM
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का

