मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. अंजनखेडा गावात श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काही शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.

यावेळी आंदोलकांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, या आंदोलनावर संबंधित पक्षांच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 01, 2026 03:14 PM
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न