AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चोर तर मी आहेच साहेब’, जेलमध्ये असणाऱ्या राजपाल यादवचं मोठं विधान, सोशल मीडियावर होतंय व्हायरल

'चोर तर मी आहेच साहेब', 9 कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या राजपाल यादवचं मोठं विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'चोर तर मी आहेच साहेब', जेलमध्ये असणाऱ्या राजपाल यादवचं मोठं विधान, सोशल मीडियावर होतंय व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 13, 2026 | 12:33 PM
Share

Rajpal Yadav : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या त्याच्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे. 9 कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याला दिल्लीतील तिहाड जेल येथे न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्या जामिनाबाबत सर्वांचे लक्ष लागले असतानाच काही वर्षांपूर्वी दिलेल्या त्याच्या एक जुन्या मुलाखतीमधील एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तिहाड कारागृहात आत्मसमर्पण केल्यानंतर राजपाल यादवच्या जुन्या मुलाखती पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले होते की, कर्ज देणाऱ्या कंपनीकडून त्याला ‘चोर’ असे संबोधले जात आहे याबद्दल त्याची काय प्रतिक्रिया आहे? यावर राजपाल यादवने अत्यंत विनोदी अंदाजात उत्तर दिले होते. तो म्हणाला होता, ‘चोर तर मी आहेच साहेब, लहानपणापासून चोर आहे, थोडा लांबचाच चोर आहे. छलिया आहे कारण ज्या मैफिलीत मी उभा राहतो, तिथे लोकांची मने चोरून घेतो’. पुढे त्याने स्पष्ट केले की लोकांची मने जिंकण्याची सवय कायम राहील, मात्र 6 कोटी रुपयांच्या या कायदेशीर प्रकरणामुळे तो खचणार नाही.

20 वर्षांपूर्वी सुरू झालेला वाद

हे प्रकरण जवळपास दोन दशकांपूर्वीचे आहे. राजपाल यादवने दिग्दर्शित केलेल्या अता पता लापता या चित्रपटासाठी घेतलेल्या कर्जातून हा वाद सुरू झाला. कालांतराने व्याज आणि कायदेशीर गुंतागुंत वाढत गेल्याने मूळ 5 कोटी रुपयांची रक्कम वाढून 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. न्यायालयाच्या आदेशानुसार राजपाल यादवने आत्मसमर्पण केले असून त्याने कायद्याचा सन्मान केल्याचे मानले जात आहे.

राजपाल यादवच्या जामिनाच्या अर्जावर दिल्ली हाईकोर्ट येथे 16 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. पुढील तारखेला तक्रारदार पक्ष आपली बाजू मांडणार आहे. त्यामुळे त्या दिवशी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चित्रपटसृष्टीचा पाठिंबा

या कठीण प्रसंगी राजपाल यादव एकटा नाही. बॉलिवूडमधील अनेक मोठी नावे त्याच्या पाठीशी उभी राहिल्याचे सांगितले जात आहे. अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन, सोनू सूद आणि वरुण धवन यांनी त्याला मदतीचा हात दिल्याची चर्चा आहे.

Follow Us
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....