AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : टीम इंडियाला हा पाकिस्तानी बॉलर हैराण करणार, नामीबिया विरुद्ध मॅचमधून धोकादायक इशारा

IND vs PAK : 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. त्यावेळी टीम इंडियाचा सामना इरासमस सारखी Action असलेला पाकिस्तानी स्पिनरशी होणार आहे.

IND vs PAK : टीम इंडियाला हा पाकिस्तानी बॉलर हैराण करणार, नामीबिया विरुद्ध मॅचमधून धोकादायक इशारा
IND vs PAK
| Updated on: Feb 13, 2026 | 10:38 AM
Share

भारतीय क्रिकेट टीमसाठी टी20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात चांगली झाली आहे. ग्रुप स्टेजमधले दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने सुपर-8 राऊंडमध्ये आपलं स्थान जवळपास पक्क केलं आहे. दोन्ही सामने जिंकले असले तरी टीम इंडियाच प्रदर्शन अपेक्षेनुसार झालेलं नाही. खासकरुन फलंदाजांनी दोन्ही सामन्यात वेगवेगळ्या प्रसंगात निराश केलं. नामीबिया विरुद्ध एका गोलंदाजाने अशा पद्धतीने हैराण केलं जो, पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी गंभीर इशारा आहे. भारत-नामीबियामध्ये नवीन दिल्लीत झालेला सामना टीम इंडियाने 93 धावांनी जिंकला. हा विजय इतका मोठा आहे की, समोरच्याला पाहणाऱ्याला असं वाटेल की, टीम इंडियाला कुठलीच अडचण आली नसेल. टीम इंडियाने 209 धावांचा डोंगर उभारला. प्रतिस्पर्धी नामीबियाचा डाव 116 धावांवर आटोपला. इतका मोठा स्कोर आणि एक सोपा विजय जरी वाटत असला, तर हा सामना टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी एक गंभीर इशारा आहे.

नामीबिया विरुद्ध टीम इंडियाने मोठा स्कार उभारला पण त्यांचा कॅप्टन गेरहार्ड इरासमसने भारतीय फलंदाजांना खूप हैराण केलं. इरासमसने 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 20 धावा देऊन 4 विकेट काढले. यात दोन विकेट एकाच ओव्हरमध्ये काढल्या. संपूर्ण डावात नामीबियाच्या अन्य गोलंदाजांची धुलाई सुरु होती. पण ऑफ ब्रेक बॉलिंग करणाऱ्या इरासमसने भारतीय फलंदाजांना लगाम घातला. त्याने इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांच्या विकेट काढल्या.

Action पारंपरिक स्पिनर प्रमाणे हाय आर्म नाहीय

इरासमस विरुद्ध टीम इंडियाने केलेल्या प्रदर्शनाचा पाकिस्तानशी काय संबंध? असा तुम्ही विचार करत असाल, तर ही गोष्ट समजून घ्या. नामीबियाचा कॅप्टन ज्या Action ने गोलंदाजी करतो, एकदम तशाच गोलंदाजाचा सामना भारतीय फलंदाजांना पाकिस्तान विरुद्ध करायचा आहे. गेरहार्ड इरासमसची Action पारंपरिक स्पिनर प्रमाणे हाय आर्म नाहीय. तो साइड आर्म किंवा स्लिंग स्टाइलमध्ये गोलंदाजी करतो. यात चेंडू डोक्यावरुन टाकण्याऐवजी साइडने टाकला जातो. टीम इंडियामध्ये अशी गोलंदाजी केदार जाधव करायचा. आता रियान पराग आहे.

जास्त आव्हानात्मक गोलंदाज

इरासमसच्या ऑफ स्पिन गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना खूप हैराण केलं. 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. त्यावेळी टीम इंडियाचा सामना इरासमस सारखी Action असलेला पाकिस्तानी स्पिनर उस्मान तारिकशी होणार आहे. उस्मान तारिक साइड आर्मने Action ने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. उस्मान तारिक हा इरासमस पेक्षा पण जास्त आव्हानात्मक गोलंदाज आहे. कारण चेंडू टाकण्याआधी एक-दीड सेकंद तो थांबतो. त्यामुळे फलंदाज सुद्धा गडबडतो. तारिकने अवघ्या चार सामन्यात 11 विकेट घेतलेत. टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवायचा असेल तर या चार ओव्हरमध्ये विशेष सतर्क रहावं लागेल.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात