31 डिसेंबरलाही साई मंदिर खुलं राहणार, साई संस्थानचा निर्णय

| Updated on: Dec 30, 2020 | 10:38 AM

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला साई मंदिर सुरु ठेवण्याची मागणी साई भक्तांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सरकारच्या नियमांचं पालन करत 31 डिसेंबरच्या रात्रीही मंदिर सुरु ठेवण्याचा निर्णय साई संस्थानकडून घेण्यात आला आहे.

31 डिसेंबरलाही साई मंदिर खुलं राहणार, साई संस्थानचा निर्णय
Follow us on

शिर्डी: कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे सरकारने घालून दिलेल्या नियमावलीनुसार सुरु करण्यात आली आहेत. मात्र, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला साई मंदिर सुरु ठेवण्याची मागणी साई भक्तांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सरकारच्या नियमांचं पालन करत 31 डिसेंबरच्या रात्रीही मंदिर सुरु ठेवण्याचा निर्णय साई संस्थानकडून घेण्यात आला आहे. साई संस्थानच्या या निर्णयामुळे नववर्षाच्या सुरुवातीला जास्तीत जास्त भाविकांना साईंचं दर्शन घेता येणार आहे. (Sai Mandir will remain open for devotees even on the night of 31st December)

दरवर्षी 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित भाविकांनाच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी प्रवेशद्वारावर बॅरिकेटिंग करण्यात आलंय. तर मंदिरात प्रवेश घेऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी खास एलईडीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अनलॉकनंतर राज्यातील मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास साडे तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

साईबाबांच्या तिजोरीतील दानात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट

ख्रिसमसची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्‍वागतासाठी लाखो साईभक्त दर्शनासाठी गर्दी करतात. यंदाही साईभक्तांनी बाबांना भरभरुन दान दिलं आहे. गेल्या 14 दिवसात दानपेटीत रोख 3 कोटी 17 लाखांचं दान अर्पण करण्यात आलं आहे. मात्र यंदा साईंच्या झोळीतील दानात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दान प्राप्त झालं आहे. श्री साई संस्थानाने 15 डिसेंबर ते 28 डिसेंबरदरम्यान आलेल्या दानाची‌ मोजणी केली आहे. यानंतर ही माहिती समोर आली आहे. यापूर्वी साईबाबांना मिळालेल्या दानाची दर तीन दिवसाआड मोजणी केली जायची. पण आता तब्बल 14 दिवसांनंतर या दानाची मोजमाप करण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दान प्राप्त झालं आहे.

साई बाबांच्या आरतीसाठी देणगीची मागणी?

दिल्लीतील काही महिला भाविकांना साई मंदिरात आरती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणगीची मागणी होत असल्याचा आरोप केला आहे. साई बाबांच्या आरतीसाठी 25 हजार रुपये देणगी देण्याची मागणी केल्याचा या महिलांचा आरोप आहे. देणगी काऊंटरजवळ देणगीचं आवाहन करणारे आणि देणगीदारांना कोणत्या सुविधा मिळतील, याबाबत फलक लावण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

शिर्डीतील दर्शन मर्यादा वाढवली, रोज किती भाविक दर्शन घेऊ शकणार?

शिर्डीत 8 लाख भक्तांकडून साईबाबांचं दर्शन, 11 दिवसात 16 कोटींपेक्षा अधिक दान

Sai Mandir will remain open for devotees even on the night of 31st December