आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही; राऊतांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

| Updated on: Sep 04, 2021 | 1:28 PM

शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. ( Sanjay Raut)

आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही; राऊतांचा चंद्रकांतदादांवर पलटवार
संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील
Follow us on

शिरुर: शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्हाला बाळासाहेबांनी हे घाणेरडं काम कधीच शिकवलं नाही, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चंद्रकांतदादांवर चढवला. (Sanjay Raut reply chandrakant patil over his statement)

संजय राऊत आज शिरुरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. अफजल खानाचा कोथळा पुढून काढलेला आहे. जो कोणी असेल तो. शाहिस्ते खानाची बोटं समोरून तोडली आहेत. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे घाणेरडं काम कधी शिकवलं नाही. काय असेल ते समोरून. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा शिवसेनेची नाही, असं सांगतानाच पाठीत खंजीर आमच्या खुपसलेला आहे. शब्द आम्ही नाही फिरवला नाही. शब्द तुम्ही फिरवला आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

चंपा म्हणणं बरोबर नाही

चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बरोबर नाही. ते म्हणाले 105 आमदार आहेत तरी आमचा मुख्यमंत्री नाही. 105 वाले चोळत बसलात. त्यांना वाटलं ते येतील, पण आले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

अनेक बोचकी शिवसेनेतून गेली

आता राज्यात ठाकरे सरकार आहे. अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. घरवापसी म्हणता तुम्ही त्याला. रागानं घरं सोडायचं नसतं. शिवसेना हे मंदिर आहे. मधल्या काळात जे शिवसेनेच नुकसान झालं ते न भरून येणारं आहे. शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतला भगवा खाली उतरला. घरात भांडण हे होत असतात. आपण टोकाचे निर्णय घेतो. जो शिवसेनेतून दूसऱ्या घरात जातात ते सुखी नसतात. अनेक बोचकी शिवसेनेतून गेली. जे गेले त्यांना आता परत घ्यायचं नाही, असं त्यांनी सांगितलं.

शिरूरमध्ये भगवा फडकवा

राज्यात 55 ठिकाणी भगवा फडकला. काही ठिकाणी फडकवायला पाहिजे होता तो फडकला नाही. आता सरकार काही असलं तरी भगवा फडकला पाहिजे. मला खात्री आहे शिरूर आणि जुन्नर मतदारसंघात भगवा फडकेल. कोणी म्हटलं सत्ता आपल्याकडे नाही. पण मी म्हणतो सत्ता मनगटात असते. शरद आणि शिवाजीराव मनानं आणि मनगटाने भक्कम आहेत. आमच्याकडे आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद नाही. जुन्नरच्या मातीवर प्रेम करणारा मुख्यमंत्री आपला आहे. महाराष्ट्राचा इतिहास इथंच सुरू होतो आणि इथंच संपतो, असं सांगतानाच पुढचे तीन वर्ष निवडणूका येईपर्यंत आपण जे चुकलंय ते आपण मिळवलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

जुन्नरने जगाला प्रेरणा दिली

जेव्हा आम्ही अयोध्येला गेलो तेव्हा जुन्नरची माती घेऊन गेलो. कळसात इथली माती घेऊन गेलो. एवढं याचं महत्व आहे. त्यानंतर राम मंदिराच्या कार्याला वेग आला. इतकी ती पवित्र माती आहे. उद्धवजींनी ती माती दिली. जुन्नरने जगाला महाराष्ट्राला प्रेरणा दिली, असं त्यांनी सांगितलं.

शरद पवार आपलेच

राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. शिवसेना सर्वांच्या वर आहे. ही आपली पॉवर आहे. शरद पवार आपले आहेत… अजित पवार आपले आहेत… दिलीप वळसे-पाटील असतील गृहमंत्री… मात्र शिवसेना सगळ्यांच्या वर आहे. काँग्रेसला आणि भाजपला अजूनही शिवसेनेची गरज लागते, असं ते म्हणाले.

कोणी बाल बाका करू शकले नाही

देशातल्या पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांत उद्धव ठाकरे आहेत. एक दिवस उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाहीत. अनेक जण शिवसेना बुडवण्यासाठी पाण्यात बसले आहे. मात्र बाल बाका होऊ शकला नाही. बाळासाहेब म्हणायचे माझा ऑक्सिजन हा माझा शिवसैनिक आहे, असं त्यांनी सांगितलं.

फार गर्दी करू नका

उद्धव ठाकरेंनी मला इकडे दम देऊन पाठवलंय. फार गर्दी करू नका. मास्क नाही लावला तर काही खरं नाही. हा पहिला उपदेश द्या असं सांगितल होतं. मात्र मी शेवटी सांगतोय. आपण आपली काळजी घेतली पाहिजे. इतर राज्यांच्या तुलनेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचं जगानं कौतुक केलंय, असंही ते म्हणाले. (Sanjay Raut reply chandrakant patil over his statement)

 

संबंधित बातम्या:

ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर, NCP च्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांची डरकाळी

समझोता पाळायचा की पाठीत धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनेच ठरवावं; राजू शेट्टी आक्रमक

नोटबंदी कसली, ती तर माझ्या बापाची वाटबंदी, कवितेतून मोदींवर हल्लाबोल करणाऱ्या कृषीकन्येला आदित्य ठाकरेंचं मोठं गिफ्ट

कोरोनापाठोपाठ मुंबईला डेंग्यू, मलेरियाचा ‘ताप’; रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली

(Sanjay Raut reply chandrakant patil over his statement)