समझोता पाळायचा की पाठीत धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनेच ठरवावं; राजू शेट्टी आक्रमक

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावातून राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे. (NCP should decide whether to abide by agreement or stab in the back, Raju Shetti)

समझोता पाळायचा की पाठीत धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनेच ठरवावं; राजू शेट्टी आक्रमक
Raju Shetti

कोल्हापूर: राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावातून राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे. ठरलेला समझोता पाळायचा की पाठीत धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनेच ठरवायचं आहे, असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला आहे. (NCP should decide whether to abide by agreement or stab in the back, Raju Shetti)

राजू शेट्टी यांनी मीडियाशी संवाद साधताना राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला. आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असं शेट्टी म्हणाले.

तर करेक्ट कार्यक्रम करेन

मला त्या यादीतून का वगळण्यात आलं हे राष्ट्रवादीचे नेते सांगू शकतील. डावललं की नाही हे मलाही माहीत नाही, असं सांगतानाच ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशाराही त्यांनी दिला. मी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे म्हणून मला डावलले गेले आहे. मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मला आमदारकी काही मिळो न मिळो माझे आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारकडून आश्वासन नाही

पूरग्रस्तांच्या मदतीवरून शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून त्यांनी कोल्हापूर ते नरसिंहवाडीपर्यंत पदयात्रा काढली आहे. या पदयात्रेचा आज चौथ्या दिवस असून आजही पदयात्रा रांगोळी गावात आली. यावेळी त्यांचे महिला वर्गाने जंगी स्वागत केलं. राज्य सरकारकडून आम्हाला अजून कोणतेही आश्वासन आले नाही. आम्ही आमच्या जलसमाधीवर ठाम आहोत. जोपर्यंत शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना मदत मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

भाजप नेते धुतल्या तांदळासारखे नाही

केंद्र सरकारने गुजरातला जशी मदत केली तशी मदत महाराष्ट्राला करावी. भाजप नेते धुतल्या तांदळासारखे नाहीत. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने वेळीच शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, नाही तर बळीराजा रस्त्यावर येऊन आक्रोश करेल, असा इशाराही त्यांनी दिला. (NCP should decide whether to abide by agreement or stab in the back, Raju Shetti)

 

संबंधित बातम्या:

कोरोनापाठोपाठ मुंबईला डेंग्यू, मलेरियाचा ‘ताप’; रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली

पडळकर अज्ञानी बालक, त्यांना त्यांचं मूळच माहीत नाही; विजय वडेट्टीवारांची जहरी टीका

सोलापुरात सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींना 501 रुपयांचे मोफत पेट्रोल, वाचा काय आहे प्रकरण?

(NCP should decide whether to abide by agreement or stab in the back, Raju Shetti)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI