सोलापुरात सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींना 501 रुपयांचे मोफत पेट्रोल, वाचा काय आहे प्रकरण?

Petrol & Diesel | सुशील किंवा सुशीलकुमार नाव असणाऱ्या व्यक्तींना 501 रुपयांचे मोफत पेट्रोल वाटले जात आहे. दुपारी एक वाजेपर्यंत सात रस्ता येथील पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल देण्यात येईल. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या पहिल्या नागरिकाला फेटा बांधून सत्कार करण्यात आला आहे.

सोलापुरात सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींना 501 रुपयांचे मोफत पेट्रोल, वाचा काय आहे प्रकरण?
सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींंना मोफत पेट्रोल
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 11:14 AM

सोलापूर: देशभरात इंधनाचे दर वाढल्यानंतर विरोधकांकडून वेगवेगळ्या मार्गांनी केंद्र सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी मग कधी मोफत पेट्रोल वाटप तर कधी एक रुपयांत एक लीटर पेट्रोल-डिझेल अशा अनेक क्लृप्त्या लढवल्या जातात. मात्र, सोलापूर जिल्ह्यात एक अनोखा प्रकार समोर आला आहे. (Free petrol distrubution worth Rs. 501 in Solapur)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सोलापूरमध्ये एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यशोदा महिला प्रतिष्ठानकडून हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये सुशील किंवा सुशीलकुमार नाव असणाऱ्या व्यक्तींना 501 रुपयांचे मोफत पेट्रोल वाटले जात आहे. दुपारी एक वाजेपर्यंत सात रस्ता येथील पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल देण्यात येईल. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या पहिल्या नागरिकाला फेटा बांधून सत्कार करण्यात आला आहे.

देशात पेट्रोल शंभरीपार, डिझेलही उच्चांकी पातळीवर

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलची किंमत ‘जैसे थे’ राहिली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या दरात (Fuel Rate) कोणताही बदल झालेला नाही. कालदेखील देशभरात इंधनाचे दर स्थिर होते. सध्या मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.39 रुपये आणि डिझेलसाठी 96.33 रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.34 आणि 88.77 इतका आहे.

मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. इंधनाच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक काढला होता. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल शंभरीपार पोहोचले आहे. मात्र, जुलै महिन्यात या दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यानंतर संपूर्ण जुलै महिना पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. तर ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात इंधनाचे दर किंचित का होईना कमी झाले होते. चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तब्बल 60 पैशांची कपात झाली होती. गेल्या आठवडाभरापासून इंधनाचे दर स्थिर आहेत.

‘यूपीए सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे आमच्यासाठी सध्या पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे अशक्य’

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सध्या कपात करणे शक्य नसल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यासाठी त्यांनी यूपीए सरकारलाच जबाबदार धरले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना चढ्या दराने तेल रोखे (Oil Bonds) जारी केले होते. त्या रोख्यांचा कालावधी आता पूर्ण झाला असून पेट्रोलियम कंपन्यांकडून ते वटवले जात आहेत. परिणामी मोदी सरकारला रोख्यांचे पैसे आणि व्याज चुकते करावे लागत आहे. त्यामुळे आम्हाला तुर्तास इंधनाचे दर (Fuel Price) कमी करणे शक्य नाही. यूपीए सरकारने ही चूक केली नसती तर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सहज कपात करता आली असती, असे प्रतिपादन निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

भाजपचं ओळखपत्र दाखवा, पेट्रोल मोफत मिळवा; शिवसेनेच्या वर्धापनदिनी खास ऑफर

हजार रुपयांच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री…, उल्हासनगरच्या व्यापाऱ्याची भन्नाट आयडिया

Dombivali मध्ये एका रुपयात एक लीटर पेट्रोल; पेट्रोल पंपावर तरुणांची भली मोठी रांग

अजित पवारांच्या वाढदिवसाला पुणेकरांची चांदी, एका रुपयात 1 लिटर पेट्रोल, ग्राहकांची झुंबड!

(Free petrol distrubution worth Rs. 501 in Solapur)

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.