अजित पवारांच्या वाढदिवसाला पुणेकरांची चांदी, एका रुपयात 1 लिटर पेट्रोल, ग्राहकांची झुंबड!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातल्या धानोरीत अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. | Ajit Pawar Birthday

अजित पवारांच्या वाढदिवसाला पुणेकरांची चांदी, एका रुपयात 1 लिटर पेट्रोल, ग्राहकांची झुंबड!
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धानोरीत एक रुपये प्रति लिटरने पेट्रोल देण्यात आलं.
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 2:36 PM

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून नगण्य दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच चांदी झाली आहे. पुण्यातल्या धानोरीत अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. सध्या मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 107 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.

पुणेकरांची चांदी, एका रुपयात 1 लिटर पेट्रोल!

पेट्रोल दरवाढीसाठी केंद्र सरकार कसं जबाबदार आहे, हे वारंवार अजित पवार यांनी दाखवून दिलंय, तशी टीका ते वारंवार करत असतात. राष्ट्रवादीने महागाई विरोधात अनेक वेळा आंदोलनही केलं आहे. आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा- अजित पवार

देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. अनेक जवळची माणसं आपल्याला सोडून जात आहेत. अशावेळी थाटामाटात वाढदिवस साजरा करणं उचित नाही. त्यामुळे यंदा साधेपणाने वाढदिवस साजरा करत कार्यकर्ते, शुभचिंतकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचं आवाहन खुद्द अजित पवार यांनी केलंय.

बीडमध्ये महाआरोग्य शिबीर!

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा करण्याचा संकल्प केलाय. त्यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करत या शिबिराच्या माध्यमातून मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी करण्याचा त्यांचा मानस आहे.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटल आणि स्व. मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट (जालना रोड बीड) येथे मोफत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी या मराठवाडास्तरीय मोफत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन आ. प्रकाश सोळंके यांनी केलं.

(Dhanori Shashikant Tingare Distributing petrol of RS 1 Rupees One Litre To Celebrate DCM Ajit Pawar Birthday)

हे ही वाचा :

अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा, महिनाभर मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी, संदीप क्षीरसागरांचं ‘महाआरोग्य शिबीर’!

अजितदादांच्या स्वभावाचा ‘तो’ गुण सांगत रोहित पवारांकडून खास वाढदिवसाच्या शुभेच्छा

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.