अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा, महिनाभर मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी, संदीप क्षीरसागरांचं ‘महाआरोग्य शिबीर’!

बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा करण्याचा संकल्प केलाय. त्यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलंय.

अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा, महिनाभर मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी, संदीप क्षीरसागरांचं 'महाआरोग्य शिबीर'!
अजित पवार आणि संदीप क्षीरसागर

बीड :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचा आज वाढदिवस… त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा करण्याचा संकल्प केलाय. त्यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करत या शिबिराच्या माध्यमातून मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी करण्याचा त्यांचा मानस आहे.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटल आणि स्व. मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट (जालना रोड बीड) येथे मोफत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी या मराठवाडास्तरीय मोफत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन आ. प्रकाश सोळंके यांनी केलं.

महिनाभर मोफत शिबीर

हे शिबीर महिनाभर चालणार असून यात दररोज 10 रुग्णांपर्यंत तपासणी केली जाणार आहे. आत्तापर्यंत 200 पेक्षा अधिक रूग्णांनी नोंदणी केली आहे. नोंदणी जेवढ्यांनी केली तेवढ्यांची मोफत अँजिओप्लास्टीकरून आवश्यक रूग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती संदीप क्षीरसागर यांनी दिली.

नोंदणी केलेल्या सर्व रुग्णांची तपासणी होणार

अजितदादांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याची सूचना आहे. याच निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवत असतांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीचे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. शिबीराला चांगला प्रतिसाद असून दीडशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंदणी झालेली आहे. नोंदणी झालेल्या सर्व रुग्णांवर तपासणी आणि आवश्यक त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत, अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली.

जनतेच्या सेवेत कधीच कमी पडणार नाही

काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटलच्या माध्यमातून रूग्णांची सेवा करत आहोत. कोव्हिड काळातही सातत्याने बेड, ऑक्सिजन, औषधे आदी कामे माझ्यासह आमच्या टीमने केली आहेत. यापुढेही करत राहू, तिसरी लाट येवू नये ही ईश्वराकडे प्रार्थना. बीडच्या जनतेच्या सेवेत कधीच कमी पडणार नाही, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी आमदार क्षीरसागर यांनी दिली.

(NCP MLA Sandeep Kshirsagar orgnized mahaAarogya Shibir Occassion of DCM Ajit Pawar birthday)

हे ही वाचा :

अजितदादांच्या स्वभावाचा ‘तो’ गुण सांगत रोहित पवारांकडून खास वाढदिवसाच्या शुभेच्छा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI